Girlfriend Marries Lover Body Mother Accepts Her as Son Saam
महाराष्ट्र

'आंचल माझी मुलगी नाही तर..' लेकाच्या मृत्यूनंतर सक्षमची आई काय म्हणाली? गुणरत्न सदावर्तेंकडे केली मोठी मागणी

Girlfriend Marries Lover Body Mother Accepts Her as Son: 'आंचलला मी मुलगी मानणार नाही, माझा मुलगा मानणार, तिच्यात मी सक्षमला पाहते. शेवटपर्यंत तिची साथ नाही सोडणार' - संगीता ताटे - सक्षमची आई.

Bhagyashree Kamble

नांदेडमधील प्रेमप्रकरणामुळे संपूर्ण राज्याला हादरा बसला. प्रेयसीच्या कुटुंबियांना मुलगा पसंत नसल्याकारणाने त्याला ठार मारण्यात आले. यानंतर प्रेयसीनं प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. तसेच तिनं वडील आणि २ भावांविरोधात पोलीस ठाण्यात साक्ष दिली. या प्रकरणानंतर प्रियकराच्या आईनं तरूणीला घरात आसरा दिला. या घटनेनंतर पहिल्यांदाच समाजमाध्यमांसमोर प्रियकराच्या आईनं प्रतिक्रिया दिली आहे.

सक्षम ताटे असे मृत तरूणाचे नाव आहे. तर, आंचल असं प्रेयसीचं नाव आहे. आचंल सध्या सक्षमच्या घरात राहते. मयत सक्षमच्या आईनं आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबानं आचंलचा स्वीकार केला आहे. या घटनेनंतर सक्षमच्या आईनं सांगितलं की, 'सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आंचल पोलीस ठाण्यात गेली. ती खूप रडत होती. सक्षमच्या जाण्याचं दु:ख तिला होतं. नंतर ती आमच्यासोबत घरी आली', असं सक्षमची आई संगीता ताटे म्हणाल्या.

'माझ्या गळ्यात पडून ती रडली , आणि म्हणाली तुमच्या घरी येते. मी त्या दिवशी तिला घेऊन आले. जसं मी माझ्या मुलावर प्रेम करत होते, तसेच प्रेम मी आंचल वर करेल , मी तिला मुलगी मानणार नाही , माझा मुलगा मानणार.', असं संगीता ताटे म्हणाल्या. 'तिला माझ्या मुलाचा अधिकार देईन. तिच्यात मी सक्षमला पाहेन', असंही सक्षमची आई म्हणाली.

'मला मुगली नाही , माझी स्वतःची मुलगी म्हणून मी तिच्यावर प्रेम करेन. आयुष्यभर आंचलवर प्रेम करेल, जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत प्रेम करेल. तिने माझी साथ नाही सोडली , तर मी पण आयुष्यभर तिची साथ नाही सोडणार', असं सक्षमची आई म्हणाली. 'माझी मागणी आहे माझ्या लेकाला न्याय मिळावा. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हा खटला चालवावा', अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India: विराट-रोहितला मिळणार 'फुल इज्जत', गंभीर-आगरकरचा BCCI घेणार क्लास, बोलवली तातडीची बैठक

Aliv Kheer Recipe: रोज काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते? मग आजचं घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी अळीवाची खीर

Maharashtra Live News Update: शरद पवारांमुळेच मला कामाची संधी मिळाली हे मी कधीही विसरू शकत नाही- अजित पवार

Beed Tourist Places: धार्मिक अन् सांस्कृतिक वारसा लाभलेल्या बीड जिल्ह्यातील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Akola: नगरसेवकपदाच्या उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निग वॉकला गेले असता चाकूने सपासप वार

SCROLL FOR NEXT