Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Nanded News : लोहा येथे तहसील कार्यालय परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. मतमोजणी सुरु असतानाच केंद्राच्या बाहेर दोन गटांमध्ये वाद होऊन एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना घडली

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणी दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे घडला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकारामुळे येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत आहे. काही मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया अजून सुरु आहे. याच दरम्यान (Nanded) नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे तहसील कार्यालय परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे. मतमोजणी सुरु असतानाच केंद्राच्या बाहेर दोन गटांमध्ये वाद होऊन एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 

मतदान केंद्राबाहेर दोन गटात तूफान दगडफेक झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्या जमावाला पोलिसांनी पांगविले असून याठिकाणी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवला असून लोहा येथे तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

पावसाळ्यात प्या हेल्दी आणि टेस्टी 4 घरगुती सूप, झटक्यात वजन होईल कमी

Heart attack symptoms: हार्ट अटॅक येण्याचा धोका कोणाला जास्त? शरीर आधी देत असलेल्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: मानपाडा उड्डाण पुलावर कंटेनरचा अपघात

SCROLL FOR NEXT