Nanded Hospital News Saamtv
महाराष्ट्र

Nanded Hospital News: नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच, रुग्णालयात आणखी ७ रुग्ण दगावले; मृतांचा आकडा ३१ वर

Nanded Government Hospital Death Cases: या घटनेनंतर राज्य सरकारवर सडकून टीका होत असून राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Gangappa Pujari

Nanded Government Hospital Death Cases:

नांदेड शासकीय रुग्णालयातील २४ रुग्णांच्या मृ्त्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावरुन राज्य सरकारवर सडकून टीका होत असून राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (२, ऑक्टोंबर) ला नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १२ नवजात बालकांसह २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

रुग्णालयात औषधांचा तुटवडा आणि वेळेत उपचार न मिळाल्याने हे रुग्ण दगावल्याचा आरोप केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे मृत्यूचे सत्र अद्याप सुरू असून रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

अशोक चव्हाण यांचे ट्वीट...

"नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी... असे ट्वीट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

राज ठाकरेंचा संताप...

दरम्यान, शासकीय रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही संताप व्यक्त केला आहे. "तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT