Nanded government holidays cancelled from October 2 to October 4 2026 saam tv
महाराष्ट्र

2 ते 4 ऑक्टोबरच्या सरकारी सुट्ट्या रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना मदत आणि आवश्यक सुविधा वेळेत मिळाव्यात, तसेच प्रशासनाच्या उपाययोजनांमध्ये खंड पडू नये यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा न घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. आगामी २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीच्या काळातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून कामकाज पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे आदेश देण्यात आले आहेत. आणीबाणीची आणि संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याने रजा घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारी सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून दुष्काळसदृश्य परिस्थितीशी संबंधित कामकाजावर लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांना आवश्यक त्या सुविधा आणि मदत वेळेत मिळावी यासाठी प्रशासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा न मागण्याचे निर्देश दिले आहेत. दुष्काळसदृश्य परिस्थितीत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये कोणताही खंड पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा पावसाने दडी मारल्याने बळी राजावर मोठं संकट निर्माण झाले आहे. सरकारकडून राज्यात 250 पेक्षा जास्त तालुके हे दुष्काळसदृश्य परिस्थितीत असल्याचा जीआर काढण्यात आला आहे. सर्वच नेते हे शेतकऱ्यांच्या बाधावर उतरले होते. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर जगाच्या पोशिंद्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आलीय. अशातच प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी नांदेड जिल्हयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : मध्यरात्री ३ वाजता अचानक दचकून जाग येते? यामागे असू शकतं 'हे' गंभीर कारण, वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: प्रस्तावित कचरा डेपो विरोधात सावळा, सुंदरखेड, माळविहीर ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..

सणासुदीच्या तोंडावर साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, साठेबाजांचे दाबे दणाणले; काढला नवा आदेश

Vastu Tips Inauspicious Signs : हातातून ‘या’ 5 वस्तू खाली पडल्या तर मानलं जातं अशुभ; कुटुंबावर येऊ शकतं संकट?

BJP Maharashtra : भाजपचा मेगाप्लान! महाराष्ट्रात नव्या टीमची घोषणा, विरोधकांची धार बोथट करणार

SCROLL FOR NEXT