Ganesh Festival Saam tv
महाराष्ट्र

Ganesh Festival: नांदेडच्या गणेश मूर्तींना तेलंगणात मागणी; मुर्तीच्या दरात यंदा २० टक्क्यांनी वाढ

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती कारागीर देखील गणरायाच्या मुर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. नांदेडमध्ये तयार होणाऱ्या मुर्तीना दरवर्षी प्रमाणे यंदा ही तेलगंणा राज्यात मागणी वाढली आहे. दरवर्षी नांदेड जिल्ह्यातून ६० टक्के गणरायाच्या मुर्तीची विक्री तेलगंणा राज्यात होतं असते. (Live Marathi News)

आगामी १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात गणेश उत्सवाचा उत्साह असतो. अकरा दिवस भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा साजरा केला जातो. तेलगंणा राज्यातील निझामाबाद, आदिलाबाद, कामारेड्डी, बोधन, भैसा, आरमूर आदी ठिकाणी नांदेडच्या बाप्पाच्या मुर्तीना मागणी असते. शहरातील गाडीपूरा, कौठा, सिडको या भागात मोठ्या प्रमाणात गणरायाच्या मुर्ती तयार करणारे कारखाने आहेत. सहा महिन्यापूर्वीपासून मुर्तीचे काम सुरु असते. नांदेडमध्ये ४ फुटापासून ते १२  फुटापर्यंत मुर्ती तयार केल्या जातात. यंदा वाढत्या महागाईचा फटका गणरायाच्या मुर्तीना देखील बसला आहे. 

२० टक्क्यांनी दर वाढ 

मुर्ती तयार करण्यासाठी लागणारे पिओपी, काथ्या, फ्लोर सेंट कलर, रेनबो कलर, वेलवेट कलर, स्टोन, लेस आदि साहित्यामध्ये वाढ झाली आहे. तसेच मजूरी वाढल्याने मुर्त्यांच्या दरात २० टक्यांनी वाढ झाली आहे. शासनाने मूर्ती कारागिराना मदत करावी अशी मागणी न्यू गजेद्र मूर्ती सेंटरचे संचालक गजेद्र ठाकूर यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

SCROLL FOR NEXT