विमानतळ पोलिसांची जुगारावर कारवाई 
महाराष्ट्र

नांदेड : जुगार अड्ड्यावरुन माजी नगरसेवकासह पाच जणांना अटक

विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे स्वतः आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. २६) रात्री गस्त घालत होते.

Pralhad Kamble

नांदेड : शहराच्या सांगवी परिसरातील एका शेतामध्ये झन्ना- मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर विमानतळ पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एका नगरसेवकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी रोख साडेआठ हजार आणि तीन दुचाकी असा एक लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी सोमवारी (ता. २६) रात्री दहाच्या सुमारास केली. Nanded-Five- people- including- a -former -corporator-were- arrested- from -a- gambling -den

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे स्वतः आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. २६) रात्री गस्त घालत होते. यादस्त दरम्यान त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सांगवी शिवारात असलेल्या आनंद तिडके यांच्या शेतामध्ये झन्ना- मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सोमवारी रात्री दहाच्या सुमारास त्या ठिकाणी कारवाई केली.

हेही वाचा - IPL 2021: दिल्लीसाठी खूषखबर! दिग्गज खेळाडूचं संघात होेणार पुनरागमन?

यावेळी पाच जणांना त्यांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यामध्ये महम्मद शाहेद महमद शौकत (वय ३८) राहणार रहेमतनगर, मीर अली मुक्तार आली (वय ३७) राहणार उमर कॉलनी देगलूर नाका, महम्मद इमरान उर्फ इब्राहीम अब्दुल वहाब बिलालनगर, सय्यद फसीओद्दीन सय्यद बकियोद्दीन (वय ४७) रा. रहमतनगर (माजी नगरसेवक) आणि शेख आवेज शेख संदल (वय ३३) रा. चुनाभट्टी देगलूर नाका नांदेड यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख आठ हजार पाचशे रुपये आणि दीड लाख रुपयांच्या तीन दुचाकी व काही मोबाईल असा एकूण एक लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

SCROLL FOR NEXT