संजय सूर्यवंशी
Nanded Farmer News: अपंगत्वावर मात करत एका तरुण शेतकऱ्याने शेती फुळवलीय. शेतीत राबून भरघोस उत्पन्न काढत आपल्या दोन बहिणीचे लग्न केले. त्यानंतर आता तिसऱ्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू आहे.
चंद्रकांत नरोटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नरोटे हे जन्मतःच दोन्ही पायांनी अपंग. चंद्रकांत हे घरात सर्वात मोठे. त्यांच्या तीन बहिणी त्यांच्या पेक्षा लहान. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने 10 वी पर्यंत शिक्षण झालं. परंतु परिस्थिती पुढे मुळे शिक्षण घेता आलं नाही. (Latest Marathi News)
चंद्रकांत यांना वडिलोपार्जित तीन एकर शेती (Farmer) आहे. घरचा संसाराचा गाडा हाकताना मोठ्या अडचणी आल्या.पण चंद्रकांत यांनी या सर्वावर मात करत शेती करण्याचा निर्णय केला. स्वतःची तीन एकर आणि इतर शेतकऱ्याची 7 एकर शेती करुन चंद्रकांत यांनी परिस्थितीवर मात केली.
दोन्ही पायांनी अपंग असलेले चंद्रकांत हे स्वतः शेतीतील सर्व कामे करतात. जिद्द, मेहनत आणि आत्मिश्वासाच्या बळावर चद्रकांत हे शेतीत यशस्वी झाले. अनेक संकटावर मात करत शेतीत राबून भरघोस उत्पन्न मिळविले आणि आपल्या घरच्या संसारा सोबतच दोन बहिणीचे लग्न मोठ्या थाटात केले.आता तिसऱ्या बहिणीच्या लग्नाची तयारी चद्रकांत करीत आहेत. (Nanded News)
अपंग असून जिद्दीने शेतीसह आपला संसारही चंद्रकांत नरोटे यांनी फुलविला आहे. शेती परवडणारी नाही, शेतीत काही उरत नाही,म्हणून नैराश्यात जगणाऱ्या शेतकऱ्यांना चंद्रकांत नरोटे यांनी संदेश दिला आहे. अपंगत्ववर मात करत आत्महत्या करणारण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्या समोर चंद्रकांत नरोटे यांनी हे आदर्श ठरत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.