Nanded delivery boy beaten CCTV video saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण, घटनेचा CCTV Video व्हायरल

Zomato's delivery boy beaten : रंगाने माखलेल्या तरुणांनी एका डिलिव्हरी बॉयला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने मोठी काठी मारल्याने डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला.

Chandrakant Jagtap

>>संजय सूर्यवंशी, नांदेड

Nanded delivery boy beaten CCTV video : नांदेड शहरातील बजरंग नगर येथे झोमटो कंपनीच्या डिलिव्हरीबॉयला काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना होळीच्या दिवशी घडली. यावेळी रंगाने माखलेल्या तरुणांनी एका डिलिव्हरी बॉयला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने मोठी काठी मारल्याने डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला.

या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमरान तांबोळी असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तो होळीच्या दिवशी बजरंगनगर येथे पार्सल देण्यासाठी गेला होता. पार्सल देउन तो पैसे घेण्यासाठी थांबला तेव्हा तेथे रंगाने माखलेले चार तरुण आले आणि त्यांनी अमरानला मारहाण करण्यास सुरूवात केली.

या तरुणांनी अमरानला तो गाडीवर बसलेला असताना अचनाक आधी लाथा-बुक्यांनी मारहान करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यातील एकाने मोठी घेऊन त्याच्या पाठीत मारली. यामुळे तो गंभीर जखमी झाला. यानतंर या युवकांनी दगडफेक देखील केली. त्यात अमरान गंभीर जखमी झाला. (Latest Marathi News)

या घटनेनंतर अमरानने त्याच दिवशी सायंकाळी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली. या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर पाच दिवसांनी विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. तर इतर तिघांचा शोध पोलिस घेत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Number Change: तुमचा WhatsApp नंबर कसा बदलण्याची सोपी ट्रिक, फक्त 'हे' सोपे स्टेप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: वसईतील विहिरीत १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

AI Video Creation: व्हिडिओ मेकिंग सोपं झालं! स्क्रिप्ट अपलोड करा आणि बघा कमाल, कोणतं आहे नवीन फिचर? वाचा सविस्तर

Mithila Palkar: साउथ इंडियन लूकमध्ये मिथिलाचं सौंदर्य खुललं| PHOTO

Black Box For Tractors: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर जीपीएस आणि ब्लॅक बॉक्सची सक्ती; नव्या नियमांवर संतापाची लाट

SCROLL FOR NEXT