Demand for Male Child Leads to Harassment Saam
महाराष्ट्र

वंशाच्या दिव्यासाठी गर्भवती महिलेचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून मृत्यूला कवटाळलं

Demand for Male Child Leads to Harassment: मुलगा होण्यासाठी सततचा त्रास आणि मारहाण. सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती विवाहतीनं आयुष्य संपवलं. पतिसह तीन नणंदांवर गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

  • सासरच्यांकडून छळ

  • पैशांचीही मागणी

  • गर्भवती विवाहितेनं आयुष्य संपवलं

  • पती - नणंदांवर आरोप

नांदेडमध्ये प्रियकराची गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी हत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. मात्र, नांदेडमधील आणखी एका घटनेमुळे तुमची तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. एका गर्भवती विवाहित महिलेनं सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाईला सुरूवात केली. पोलिसांनी पतीसह ३ नणंदांवर गुन्हा दाखल केला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी प्रतीक्षा भोसले हिचा विवाह २०२३ साली नांदेडमधील लक्ष्मण भोसले याच्याशी झाला होता. मार्च २०२४ साली प्रतिक्षाला मुलगी झाली होती. पण सासरच्या मंडळींना मुलाची अपेक्षा होती. त्यांना मुलगा हवा होता. मुलगा पाहिजे म्हणून प्रतीक्षाला वारंवार त्रास देण्यात येत होता.

माहेरहून स्कूल व्हॅनसाठी पाच लाख रूपये आणण्यासाठी पीडित महिलेला त्रास दिला जात होता. तिचा वारंवार मानसिक तसेच शारीरिक छळ केला जात होता. पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर मारहाणीमुळे एकवेळा प्रतीक्षाचा गर्भपात झाला. तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर तिला एका डॉक्टरकडे नेण्यात आले. मुलगा व्हावा म्हणून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

वैद्यानं दिलेलं औषध प्रतिक्षा घेत नव्हती. या कारणामुळे नवरा प्रतिक्षाला मारझोड करी. इतकंच नाही तर, मुलगा व्हावा म्हणून नणंदा देखील प्रतिक्षाला मानसिक त्रास देत होते. नणंदा फोनवरून धमकी आणि शिवीगाळ करायच्या. या सर्व त्रासाला कंटाळून प्रतीक्षाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तिनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

या घटनेनंतर प्रतिक्षाच्या घरच्यांना धक्का बसला. पीडित महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रतीक्षाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती लक्ष्मण भोसले आणि तीन नणंदांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Municipal Election : प्रचार संपण्याआधीच भाजपला जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार नाही? कारण आलं समोर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

SCROLL FOR NEXT