संजय सूर्यवंशी, साम टीव्ही
Nanded Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. खून, दरोडे, मारामारी आणि चोऱ्यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. एकीकडे पोलिस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना, दुसरीकडे नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कौठा भागात चड्डी गँगने दहशत माजवली आहे.
पंढरपूर (Pandharpur) येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताचे घर फोडून चड्डी गँगने सोने-चांदीसह रोख रक्कम लंपास केली. सोमवारी रात्री जुना कौठा (Nanded News) परिसरातील कपिलेश्वर नगर येथे ही घटना घडली. घरफोडी करणारे हे चोरटे परिसरातील एका सीसीटीव्ही कैमेरात कैद झाले आहेत.
या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास पाच चोरटे चड्डी बनियानवर परिसरात फिरत होते. यावेळी चोरट्यांनी फोटोग्राफरचा व्यवसाय करणारे संजय गिरी यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून संधी साधली.
चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून (Crime News) आत प्रवेश केला. घरातील कैमेरा आणि सोनं चांदी,यासह रोख रक्कम असे जवळपास एक लाख रुपयाचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. मागील काही दिवसा पासून चड्डी गँगने या परिसरात दहशत माजवली आहे. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांचा लवकरात लवकरत बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.