Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded News: धाडसी दरोडा..वृध्दांना मारहाण करुन चार लाखांचा ऐवज लुटला; मारहाणीत वृध्द महिलेचा मृत्यू

धाडसी दरोडा..वृध्दांना मारहाण करुन चार लाखांचा ऐवज लुटला; मारहाणीत वृध्द महिलेचा मृत्यू

संतोष जोशी

नांदेड : नांदेडच्या देगलूरमध्ये टाकण्यात आलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी (Robbery) चार लाखांचा ऐवज लांबविला. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्‍या मारहाणीत एका वृध्द महिलेचा मृत्यू (Death) झाला आहे. (Tajya Batmya)

नांदेडमधील शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री तीन ते चार दरोडेखोरांनी श्रीपतराव पाटील यांच्या घरी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी 90 वर्षाच्या श्रीपतराव आणि पत्नी चंद्रकला यांचे हातपाय बांधून त्यांना मारहाण करत बारा तोळे सोन्याचे दागिने, 70 तोळे चांदी आणि रोख रक्कम अशी चार लाखांचा ऐवज लंपास केला.

पोलिसांचे पथक रवाना

वृद्धांचे हातपाय बांधून केलेल्‍या मारहाणीत (Crime News) चंद्रकलाबाई यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी भेट देऊन दरोडेखोरांच्या शोधात दोन पथके रवाना केली आहेत. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT