Dhanshri Shintre
जेवणाला खास चव देण्यासाठी कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरला जातो, जो अन्नाचा स्वाद वाढवतो आणि सुगंध आणतो.
कढीपत्त्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात.
पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर लवकर खराब होतात, त्यामुळे त्यांना ताजे ठेवणे कठीण जाते.
चला तर मग, पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताज्या ठेवण्यासाठी योग्य साठवणुकीच्या पद्धती जाणून घेऊया.
सर्वप्रथम कढीपत्ता आणि कोथिंबीर स्वच्छ धुवा, नंतर चांगले वाळवून योग्य प्रकारे साठवून ठेवा.
साठवण्याआधी पाने ओले ठेवू नका कारण पावसाळ्यात ओलावा वाढल्याने ती लवकर खराब होतात.
साठवण्यासाठी हवाबंद डब्यात रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा, त्यावर पाने ठेऊन डबं नीट बंद करा.
कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजं ठेवायचं असल्यास पाने देठापासून वेगळ्या करून प्लास्टिक पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.