Nanded crime news saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime News: धक्कादायक! फसवणूक करून शेतजमीन घेतल्याने शेतकऱ्याने संपवले आयुष्य; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

फसवणूक झाल्याने आता उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे...

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, प्रतिनिधी...

Himayat nagar Crime News: नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फसवणूक करून शेतजमीन नावावर करून घेतल्याने एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हयातनगरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याबाबत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फसवणूक करून शेतजमीन नावावर करून घेतल्याने एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हिमायतनगर मध्ये ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिमायतनगर रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी परमेश्वर जाधव यांना 10 गुंठे शेतजमीन आहे. पैश्यांची गरज असल्याने त्यांनी एक गुंठा जमीन विक्री केली होती. पण त्यांच्या निरक्षर पनाचा फायदा घेऊन दोघांनी त्यांची सात गुंठे जमीन नावावर करून घेतली. (Latest Marathi News)

जाधव यांच्या जमिनीवर ताबा घेण्यासाठी त्यांना जीव मारण्याच्या धमक्या देण्यात येऊ लागल्या. फसवणूक झाल्याने आता उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत जाधव यांनी विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शेख इमरान शेख अनवर आणि मिर्झा जुनेद या दोघांवर आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

Kalyan Tourism : कल्ला मस्ती ऑन द वे! वीकेंडला फिरा 'कल्याण'जवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स, प्लान करा Summer ट्रिप

राजकारणात बदलाचे संकेत! २८८ नव्हे तर असतील ३५० आमदार; ५४४ ऐवजी असणार ६५० खासदार,MP, MLAची संख्या वाढणार?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील भोंदू अशोक खरात यांच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीच पथक दाखल

SCROLL FOR NEXT