Modi Ji Thali: गौतमी आणि आमदार थाळीनंतर आता चक्क 'मोदी' थाळी; मिळते तरी कुठे?

US Special PM Modi Thali: चक्क पंतप्रधान मोदींच्या नावे थाळी काढण्यात आली आहे.
Modi Ji Thali
Modi Ji ThaliSaam TV
Published On

PM Modi US Visit: हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये चमचमीत जेवणाचा अस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडतं. आजवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या खाल्ल्या असतील. खवय्यांना आकर्षित करण्यासाठी जेवणाच्या थाळीला वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. आमदार थाळीपासून ते अगदी नृत्यांगना गौतमी पाटील सारख्या कलाकारांच्या नावाची थाळी बाजारात मिळते. अशात आता चक्क पंतप्रधान मोदींच्या नावे थाळी काढण्यात आली आहे. (Latest PM Modi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २१ ते २४ जून दरम्यान अमेरिका (America) दौऱ्यावर आहेत. यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. या आधी देखील मोदींनी सात वेळा अमेरिका दौरा केला आहे. यावेळी त्यांच्या येण्याआधीच चक्क अमेरिकेत मोदींच्या नावाने एक थाळी लाँच करण्यात आली आहे.

Modi Ji Thali
Beed Crime News : तुला माझा नवरा खुप आवडतो का ? विवाहितेला पाजले विषारी द्रव्य, तिघांवर गुन्हा दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी एका रेस्टॉरंटमध्ये पंतप्रधान मोदींच्या नावाने थाळी सुरू केली आहे. रेस्टॉरंटचे मालक श्रीपाद कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. पीएम मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या थाळीचे नाव 'मोदी जी थाली' असं आहे.

मोदी जी थालीमध्ये काय स्पेशल आहे?

हॉटेल मालकांनी मोदी थाळीची खासीयत सांगितली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भारतीय व्यक्तींच्या मागणीनुसार ही थाळी बनवण्यात आली आहे. या थाळीमध्ये रसगुल्ला, सरसो साग, बटाट्याची भाजी, ढोकळा, छाछ, पापड, खिचडी अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. ही थाळी हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाने खाल्ली असून ती सर्वांना आवडली आहे.

Modi Ji Thali
Mumbai Crime News: मुंबई हादरली! आईस्क्रीम देतो सांगून मुलीला 'अंकल'ने घरी नेलं, अत्याचार केले; घृणास्पद कृत्याचा व्हिडिओही काढला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com