Nanded Bhanudas Vadje
Nanded Bhanudas Vadje Saam TV
महाराष्ट्र

वाळूचे टिप्पर चालवण्यासाठी 10 हजारांची लाच; सहाय्यक फौजदार रंगेहाथ पकडला, VIDEO व्हायरल

संतोष जोशी

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाळूचे टिप्पर सुरू ठेवण्यासाठी 10 हजारांची लाच (Bribe) घेताना स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदाराला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (LCB) पथकाने सोमवारी (13 जून) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही कारवाई केली. (Nanded Latest Crime News)

भानुदास वडजे असं लाच स्वीकारताना अटक केलेल्या सहाय्यक फौजदाराचं नाव आहे. वडजे यांनी तक्रारदाराकडून वाळूचे दोन टिप्पर चालू देण्यासाठी 12 हजाराची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडी अंती त्यांनी 10 हजार रुपये तक्रारदाराला मागितले. दरम्यान, तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी याची माहिती लाचलुचपत पथकाला दिली.

दरम्यान, तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत पथकाने तात्काळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने वडजे यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलावलं. त्यानंतर लाचलुचपत पथकाने वडजे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. त्यांची झाडझडती घेतली असता वडजे यांच्याकडे 38 हजार आणि कारमध्ये 94 हजार रुपये सापडले. दरम्यान या कारवाई चा व्हिडीओ सोशल मीडीयावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत, मी लाच स्वीकारली नाही म्हणून वडजे हे लाचलुचपत पथकासोबत वाद घालताना दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदारच लाचेच्या जाळ्यात अडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाळूसाठी लाच स्वीकारताना आठ दिवसात दुसरा पोलिस कर्मचारी अडकल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : नोकरीत मराठी माणूस नको! का? संताप-राग-खंत... मराठी तरूणांच्या भावना आल्या उफाळून

SCROLL FOR NEXT