सायबर क्राईम, नांदेडच्या दोघांना फटका 
महाराष्ट्र

सावधान : नांदेड शहरात शिक्षकासह दोघांना सव्वालाखाचा ऑनलाईन गंडा

गणेशनगर परसिरातील वृंदावन काॅलनीत राहणारे व्यावसायीक प्रवीण सोनी यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने एक एसएमएसद्वारे लींक पाठविली.

Pralhad Kamble

नांदेड : शहराच्या गणेशनगर येथील व्यावसायीक तर यशवंतनगर भागातील सेवानिवृत्त शिक्षक या दोघांना जवळपास सव्वालाखाचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध फसवणुक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (ता. २४) जूलैच्या सायंकाळच्या सुमारास घडला. Nanded- city- both- of- them- including- teacher-were- involved- in- online- scam

गणेशनगर परसिरातील वृंदावन काॅलनीत राहणारे व्यावसायीक प्रवीण सोनी यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने एक एसएमएसद्वारे लींक पाठविली. या लींकला टच करताच प्रविण सोनी त्यांच्या एसबीआय बँक शाखा गुरुद्वारा येथून बचत खात्यातून तब्बल ७१ हजार ८९५ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. हा प्रकार प्रविण सोनी यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून घडलेला फसवणुकीचा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात हॅकरविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे करत आहेत.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पुरात वाहून गेल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

तर याच ठाण्याच्या हद्दीतील दुसऱ्या घटनेत यशवंतनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश शिंदे यांना एका निनावी व्यक्तीचा बीएसएनएल कंपनीतून बोलतो असे म्हणून फोन आला. आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकायला सांगितला. ओटीपी मिळताच प्रकाश शिंदे यांच्या खात्यामधून चक्क ५० हजार रुपये लंपास करण्यात आले. प्रकाश शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनंत नरुटे करत आहेत.

ऑनलाइन फसवणुकीच्या दोन घटना एकाच ठाण्याच्या हद्दीत घडल्या. त्यामुळे सर्वसामान्य बँक खातेदारामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीशी मोबाईलवर संभाषण करताना आपली कुठलीच वैयक्तिक माहिती देऊ नये, तसेच कुठल्याही बँकेतून आपल्या ओटीपीबाबत किंवा खआत्याबाबत माहिती विचारल्या जात नाही. याची खातेदारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT