मोठी कारवाई; वाळूचे आठ हायवा ट्रक जप्त, माफियांना 35 लाखांचा दंड! SaamTvNews
महाराष्ट्र

Nanded: मोठी कारवाई; वाळूचे आठ हायवा ट्रक जप्त, माफियांना 35 लाखांचा दंड!

या धडक कारवाई मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून वाळू माफियांना अभय देणाऱ्यांवरही आता कारवाई होणार आहे.

संतोष जोशी

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) वाळू तस्करांवर दोन आयएएस (IAS) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. अवैधरीत्या वाळूची (Sand) वाहतूक करणारे आठ हायवा ट्रक जप्त करुन तहसिल कार्यालय परिसरात लावण्यात आले आहेत. आज दुपारी हि कारवाई करण्यात आली. आयएएस असलेले आणि नव्यानेच देगलूर (Deglur) येथे सहाय्यक जिल्हाधिकारी (Collector) पदी रुजू झालेल्या सौम्या शर्मा आणि मुखेड येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी देगलूर येथून अवैध वाहतूक करणारे आठ हायवा ट्रक जप्त केलेत.

हे देखील पाहा :

या धडक कारवाई मुळे वाळू माफियांचे (Sand Mafia) धाबे दणाणले असून वाळू माफियांना अभय देणाऱ्यांवरही आता कारवाई होणार आहे. जप्त केलेल्या आठ ट्रक कडून 35 लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. अशी माहिती महसुलच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. देगलूर, बिलोली तालुक्यातील वाळू केंद्रावरुन मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करुन दिवसरात्र वाहतूक केली जाते. या वाहतूक करणाऱ्या ट्रककडे जुन्या वाळूच्या राॅयल्टीच्या पावत्या आहेत. त्यामुळे ही कारवाई केली गेली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT