Maharashtra Rain News, Heavy Rain In Maharashtra News, Parbhani Rrain Today saam tv
महाराष्ट्र

Rain Update : 'वर्धा'चा पुल पाण्याखाली, परभणीत गावांचा संपर्क तुटला, गोंदिया- तिरोडा मार्ग बंद

गेले दाेन तीन दिवस परिसरात दमदार पाऊस पडत आहे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : पश्चिम महाराष्ट्रसह विदर्भात देखील जूलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. यामुळे बहुतांश ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यवतमाळ (yavatmal), अमरावती (amravati) ,परभणी (parbhani) , भंडारा (bhandara) , गाेंदिया (gondia) , नांदेड (nanded) या जिल्ह्यात पावसामुळे (rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Maharashtra Rain News)

विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले

नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पातून 82 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदी (godavari river) क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दिग्रस बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या शंभर गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवार पासून पावसाचा जोर वाढत असल्याने एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

वर्धा नदीचा पुल पाण्याखाली

यवतमाळ जिल्ह्यातील कोसारा या गावाला लागूनच वर्धा नदी वाहते. वर्धा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने राळेगाव, खैरी, माढेलीसह चंद्रपूरकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.

पूर्णा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला

परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून मंगळवारी रात्री पासून पावसाने जोर धरला आहे. आज (बुधवार) सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी,वडगाव ,फुकटगाव, सोनखेड,या चार गावांचा संपर्क तुटला आहे. मागील चोवीस तासांत तालुक्यातील सर्व मंडळात अतिवृष्टी. १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Parbhani Rrain Today)

अमरावती जिल्ह्यात पावसाची बॅटींग सुरूच

अमरावती जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाची बॅटींग सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सूर्याचे दर्शन झालेले नाही. बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून सोबतच पाच सहा किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे सुद्धा आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये गुजरात ते कर्नाटक पर्यंत कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले तसेच वाऱ्याचे कमी जास्त दाबाचे क्षेत्र विदर्भात सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भात पुढील पाच दिवस सार्वत्रिक पाऊस पडणार आहे तसेच हा पाऊस पश्चिम विदर्भात सुद्धा सार्वत्रिक स्वरूपात राहील तसेच आज अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस विदर्भात 17 तारखेपर्यंत कमी जास्त फरकाने पडत राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

गोंदिया तिरोडा मार्ग बंद

गोंदिया जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाचा फटका गोंदिया जिल्ह्यातील रस्त्यांना बसला आहे. गोंदिया तिरोडा मार्गाचा काम सुरू असून एकोडी गावाजवळ पुलिया बांधकाम सुरु आहे. त्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र तो रस्ताही पावसाने वाहून गेल्याने गोंदिया तिरोडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

दरम्यान गोसीखुर्द पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पड़त असल्याने गोसीखुर्द धरणातून4000 क्युमेक पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (Heavy Rain In Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT