Nanded Accident Saam tv
महाराष्ट्र

Nanded Accident: भीषण अपघात! ड्रायव्हर तर्राट, कारवरचा ताबा सुटला; समोर येईल ते वाहन उडवलं

Nanded News : दारूच्या नशेत कार चालवत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर रस्त्यावर उभ्या गाड्याना जोरदार धडक दिली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 

नांदेड : नांदेड शहरात आज दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात हिट अँड रणचा थरार घडला आहे. यात एका मद्यधुंद अवस्थेत कार चालवत भरधाव वेगाने येत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक देत उडविले. यामध्ये एक दुचाकीस्वार व रिक्षा चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 

नांदेड शहरातील भाग्यनगर कॉर्नर जवळ हा भीषण अपघात दुपारच्या सुमारास झाला आहे. यामध्ये भरधाव वेगाने आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षा, एक मारुती कार, बुलेट आणि इतर काही दुचाकींना जबर धडक देत उडविले. यावेळी आजूबाजूच्या परिसरात असलेल्या नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली, तरी दोघेजण गंभीर जखमी आहेत. 

कार चालकाचे नियंत्रण सुटले 

कार दिलेल्या धडकेत बुलेट चालक व एका ऑटो रिक्षा चालकाची अवस्था गंभीर आहे. जखमीना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सदर कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याचे वाहनावर नियंत्रण नसल्यामुळे उभ्या वाहनांना धडक दिली गेली. यात अनेकजण थोडक्यात बचावले आहेत. 

कार चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात 

अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. तर घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येत घटनेची माहिती घेतली. तर कार चालकाला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान सदर अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: नैसर्गिक सौंदर्य अन् नयनरम्य परिसर... धुळे जिल्ह्यातील 'ही' सुंदर ठिकाणं कधी पाहिलीत का?

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

SCROLL FOR NEXT