Nanded Crime x
महाराष्ट्र

Nanded Crime : आजीबाई घरात एकट्याच, ७५ वर्षीय महिलेला संपवलं, दुर्गंधी आल्यानं घटना उघडकीस; नांदेड हादरलं

Nanded News : एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरी मृतदेह आढळला. पोलीस तपासादरम्यान महिलेची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या दोन नातवांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिनिधी

नांदेडहून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेडच्या हिमायत नगर तालुक्यातील टेंभुर्णी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. टेंभुर्णी येथे एकटीच राहणाऱ्या ७५ वर्षाय वृद्ध महिलेचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी महिलेच्या दोन नातवांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७५ वर्षीय गयाबाई रामजी तोवर ही वृद्ध महिला एकटी राहत होती. बऱ्याच दिवसापासून महिला घरातून बाहेर पडली नव्हती. याच दरम्यान गयाबाई यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. घाणेरडा वास येत असल्याने शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला. तेव्हा शेजारच्यांमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

गयाबाई तोवर यांची हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गयाबाईंच्या दोन नातवांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नातवांनीच गयाबाईंची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर हिमायत नगर पोलिसांनी दोन्ही नातवांना दिघी येथून ताब्यात घेण्यात आले. ही हत्या कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास पोलीस करत आहेत.

नांदेडच्या टेंभुर्णी गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली. गावात एकटी राहत असलेल्या ७५ वर्षीय गयाबाई तोवर यांचा मृतदेह त्यांच्याच राहत्या घरात आढळला. गयाबाईंच्या घरातून घाणेरडा वास येत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. शेजारी राहणाऱ्या मंडळींमुळे हे हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update : अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक न्यायालयात सुनावणी

Kapil Sharma: २० वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त ४ चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक

युद्ध भडकलं! इराणवर सर्वात मोठा हल्ला कधी होणार? ट्रम्प यांनी सांगितली तारीख

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने जिगरी दोस्ताला केलं एप्रिल फूल; प्रँक पाहून मित्रानेही मारला डोक्यावर हात

SCROLL FOR NEXT