parbhani crime news Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News: Beauty Parlour मधून सव्वा लाखाचे गंठण चाेरीस; युवतींवर गुन्हा दाखल

Parbhani Beauty Parlour News: या चाेरीचा नानलपेठ पाेलिस तपास करीत आहे.

राजेश काटकर

Parbhani Crime News : परभणी शहरातील एका ब्युटी पार्लरमधून 25 ग्राम वजनाचे सुमारे 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण लंपास करण्यात आले आहे. या प्रकरणी संशयावरुन दोन महिलांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

अवंती विकास टाक या परभणीतील विसावा कॉर्नर येथील ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी गळ्यातील २५ ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण काढून बेडवर ठेवले होते. ब्युटी पार्लरमधील काम झाल्यानंतर त्या घरी गेल्या.

रात्रीच्या सुमारास त्यांना पार्लरमध्ये गंठण विसरले असल्याचे लक्षात आले. त्यांनी पार्लरमध्ये फोन करुन गंठण विषयी माहिती दिली. तसेच आई आणि भावाला पाठविले. मात्र गंठण मिळून आले नाही. या ठिकाणी असलेल्या मुलींना विश्वासात घेऊन गंठण बाबत विचारपूस केली. मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

संबंधित मुलींनी गंठण चोरले असेल असा संशय त्यांना आला. त्यांनी नानलपेठ पाेलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर अवंती टाक यांच्या तक्रारनूसार पाेलिसांनी दाेन युवतींवर गुन्हा दाखल केला. नानलपेठ पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाईवर आढावा बैठक सुरू

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

SCROLL FOR NEXT