Nana Patole
Nana Patole  Saam TV
महाराष्ट्र

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या हॉटेलात गोमांस; नाना पेटोलेंचा खळबळजनक दावा

अभिजित घोरमारे

भंडारा: गो हत्येला विरोध करणाऱ्या भाजपचे पितळ उघडे पडले असून नायजेरियात लंपी आजार (Lumpy Disease) आढळून येतो. नायजेरियातून चित्ता आणून भाजपने काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित करीत भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

तर गोमांस विक्रीला विरोध करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या गोव्यातील हॉटेलमध्ये गोमांस आढळून आल्याचा खळबळजनक आरोपही पटोले यांनी भंडारा (Bhandara) येथे माध्यमांशी बोलताना केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर नाना पटोले माध्यमांशी बोलत होते, राहुल गांधी यांची यात्रा नसून ती आता एक लोक चळवळ झाली आहे. देशात तिरंगा टिकवायचा असल्यामुळे या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पाहा व्हिडीओ -

नायजेरिया देशात लंपी या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्याच देशातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चित्ते भारतात आणले. देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई, सीमावाद मोठ्या प्रमाणात असताना चित्ता आणून दिखावा करण्याचे काम करण्यात येत आहे. भाजप शेतकरी विरोधी असून त्यांना बरबाद करण्यासाठी लंपी या रोगाची धास्ती दाखवून गोधन संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पटोलेंनी यावेळी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Voting | नाशकात Thackeray गट आणि BJP आमनेसामने

Maharashtra Lok Sabha Voting Live: अनिल अंबानी यांनी रांगेत उभा राहून बजावला मतदानाचा हक्क

Bangladesh MP: मोठी बातमी! बांगलादेशचे खासदार भारतात आल्यानंतर बेपत्ता, ३ दिवसांपासून शोधमोहिम सुरू

Cannes Film Festival 2024 : "आज तू हवी होतीस...", कान्समध्ये पोहचलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची आईसाठी भावनिक पोस्ट

Jalgaon crime : कुटुंब गाढ झोपेत; खिडक्यांच्या काचा फोडून लांबवीले ६७ हजाराचे दागिने

SCROLL FOR NEXT