Dasara Melava: दसरा मेळाव्यापेक्षा आम्हाला भारत जोडो यात्रा महत्वाची; काँग्रेसची भूमिका

आम्ही घटक पक्षात होतो एकमेकांना चांगली साथही दिली - थोरात
Uddhav Thackeray Dasara Melava
Uddhav Thackeray Dasara MelavaSaam TV
Published On

अकोला: उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली कोविडची परिस्थिती सांभाळली ती खरोखर कौतुकास्पद आहे. मात्र, दसरा मेळावा हा शिवसेना (Shivsena) पक्षाचा आहे. त्यामुळे आम्हाला भारत जोडो यात्रेकडे लक्ष द्यायचं आहे असं म्हणत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपला आणि सेनेच्या मेळाव्याचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं.

शिवाय काँग्रेस (Congress) सध्या भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) नियोजनामध्ये व्यस्त असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे. अकोल्यातील पातूर येथे आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी उर्जा मंत्री नितीन राऊत हे भारत जोडो यात्रा संदर्भात आढावा घेण्यासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पाहा व्हिडीओ -

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील दसरा मेळाव्याबाबत वक्तव्य केलं, ते म्हणाले, शिवाजी पार्कवर जो दसरा मेळावा होतं आहे, तीच खरी शिवसेना आहे. शिवाय उध्दव ठाकरेंची शिवसेना आपला दसरा मेळावा (Dasara Melava) मोठा करण्यासाठी स्वतः समर्थ आहे. आम्ही घटक पक्षात होतो एकमेकांना चांगली साथही दिली असल्याचं थोरात म्हणाले.

तर भारत जोडो साठी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देणार आहात का? या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, यात्रेचे निमंत्रण देण्याचे गरज नाही. ही यात्रा सर्वांसाठी खुली आहे.

Uddhav Thackeray Dasara Melava
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी मदत करणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

निमंत्रण देण्याचा प्रश्नच नाही. ज्यांचा राज्यघटनेवर विश्वास आहे, त्यांनी एकत्र येण्याची गरज असून लोकशाही वाचविण्यासाठी या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यांना धमकी आल्याच्या प्रश्नावर थोरात म्हणाले, आतापर्यंत कधी असं घडलं नव्हतं, त्यामुळे यांची कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचं यावरून लक्षात येते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण नसल्याची टीकाही थोरात यांनी शिंदे सरकारवर केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com