Monsoon Session : फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरिय चौकशीचे आदेश  Saam tv
महाराष्ट्र

फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलेंची याचिका; 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

अब्रनुकसानीचा दावा आणि गोळा केलेल्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी कायमस्वरूपी स्थगनादेश मिळावा ही मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

संजय डाफ

नागपूर: रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी नाना पटोलो आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही फोन टॅपिंग (Phone Tapping Case) मुद्दा चांगलाच गाजला आहे. नाना पटोलो, एकनाथ खडसे, बच्चू कडू, संजय राऊत यांसारख्या बड्या नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फोन टॅपिंग प्रकरणी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात नाना पटोलेंनी याचिका दाखल केली आहे.

अब्रनुकसानीचा दावा आणि गोळा केलेल्या माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी कायमस्वरूपी स्थगनादेश मिळावा ही मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा नाना पटोलेंनी दाखल केला आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला, केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव, पुणे पोलीस आयुक्त, महाराष्ट्र गृह मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नागपूर पोलीस आयुक्त, पुणे गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.

दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला या आज मुंबईत हजर झाल्या होत्या. अनेक दिवसांपासून त्या चौकशीला टाळाटाळ करत असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला होता. अखेर त्या आज हजर राहिल्या होत्या. गृहमंत्र्यांनीही सभागृहात फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल दिला होता त्याबाबत माहिती दिली होती. नाना पटोले, बच्चू कडू यांची नावं बदलून फोन टॅपिग झाल्याची माहिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या; तिवसा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Rahul Gandhi: 'राहुल गांधी चर्चेपासून पळू नका...', सत्ताधारी आक्रमक, संसद परिसरात काढला मोर्चा

बाजारात जाण्याची गरज नाही! घरच्या घरी कुंडीमध्ये उगवतील अशा ५ भाज्या; आजच सुरू करा किचन गार्डनिंग!

PM SVANidhi Yojana : फेरीवाल्यांसाठी खुशखबर! मिळणार ₹30,000 पर्यंत क्रेडिट कार्ड; 50 दिवस व्याज नाही

फ्लॅट मालकांसाठी मोठी बातमी! भाडेकरूने नियम मोडला तर दंड कोणाला भरावा लागणार? सोसायटीचा नियम ऐकून उडेल झोप

SCROLL FOR NEXT