nana patole  Saam Tv
महाराष्ट्र

रात्रीस खेळ चाले; गद्दारांना नाना पटाेलेंचा दणका; ५ जण निलंबित

भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी साडे अकरा पर्यंत १५.५८ टक्के मतदान झाले आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी पदाधिका-यांसह पाच कार्यकर्त्यांना पक्षातून तातडीने सहा वर्षासाठी निलंबित केले आहे. अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्याने पाच जणांवर ही कारवाई झाली आहे. नानांनी मध्यरात्री कारवाई करुन पक्षातील गद्दारांना थारा नाही असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पाेहचविला आहे.

भंडारा (bhandara) जिल्हा परिषदेच्या ३९ जागांसाठी, पंचायत समितीच्या ७९, नगर पंचायतीच्या ३८ , गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४३ , नगर पंचायतीच्या ४५ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी आज मतदान शांततेत सुरु आहे.

काॅंग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सुकळी येथील त्यांच्या गावात कुटुंबासह मतदान (voting) केले. यावेळी त्यांनी मतदानासाठी मतदारांचा उत्साह असल्याचे नमूद केले. दरम्यान पक्षाच्या विरोधातील उमेदवारांचे काम केल्याने पाच जणांवर निलंबनाची कारवाई केल्याचे पटाेले यांनी नमूद केले.

यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष राजकपूर राऊत, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग निशाने, ठाण्याचे जिल्हा परिषद प्रभारी मुन्ना भोंगडे, ठाणा पंचायत समितीचे प्रभारी जितेंद्र पडोळे यांचा समावेश असल्याचे पटाेले यांनी सांगितले.

सरचिटणीस देवानंद पवार यांनी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांना पत्र दिले आहे. कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न केल्याने या सर्वांवर कारवाई झाली आहे. संबंधितांना सहा वर्षांसाठी कॉंग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.

गोंदियात मतदान सुरु

गोंदिया जिल्ह्यात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. येथे थंडीचा जोर लक्षात घेता मतदारांचा केंद्रावर ओघ अल्प प्रमाणात आहे. साकोली तालुक्यात देखील मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

SCROLL FOR NEXT