मतदान केंद्राबाहेर BJP - NCP चे समर्थक भिडले; पोलिसांचा लाठीचार्ज

ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर पहिल्यांदांच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे.
vadanvi (beed)
vadanvi (beed)
Published On

बीड : बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीसाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यात ओबीसी वगळता ६५ जागांसाठी मतदान घेतले जात असून २६० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद. वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार येथील नगरपंचायतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान वडवणी येथे केंद्र क्रमांक तीनवर मतदानाच्या प्रारंभापासूनच दाेन गटात सातत्याने वाद सुरु हाेते. त्याचे पर्यावसन हमरीतुमरीवर आले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पाेलिसांनी भाजप (bjp) आणि राष्ट्रवादी काॅग्रेसच्या (ncp) कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. सध्या या मतदान केंद्रावर पाेलिसांचा (police) तगडा बंदाेबस्त आहे.

vadanvi (beed)
सातारा, सांगली, दापाेलीसह, सिंधूदूर्गात शांततेत मतदान सुरु

ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर, पहिल्यांदांच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. बीड जिल्ह्यात ५ नगरपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे.

पाटोदा नगर पंचायत

एकूण जागा १७

ओबीसी आरक्षण स्थगित ४

13 जागांसाठी ८८ उमेदवार भविष्य आजमावत आहेत.

भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब अजबे यांची प्रतिष्ठापणाला.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा लढत.

राखीव ४ जागेसाठी १८ जानेवारीस मतदान.

वडवणी

एकूण जागा १७

ओबीसी ४ जागा राखीव

१३ जागांसाठी ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेची प्रतिष्ठापणाला लागली असून भाजपा महाविकास आघाडीत लढत होत आहे.

ओबीसी राखीव ४ जागांसाठी १८ जानेवारीला मतदान.

येथे भाजपचे जेष्ठ नेते राजाभाऊ मुंडे यांनी आपल्या कुटुंबासह वडवणी येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान मतदान केंद्र क्रमांक तीनवर राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमाेर भिडले. परिस्थिती आटाेक्यात रहावी यासाठी पाेलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केला. सध्या येथील तणाव निवळला आहे.

vadanvi (beed)
सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीचा काय मान ठेवलात? उदयनराजेंना सवाल

केज

एकूण जागा १७

ओबीसी ४

13 जागांसाठी ६० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

केजमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना अंतर्गत लढत आहे. भाजपचा एकही उमेदवार नाही.

ओबीसी राखीव 4 जागेसाठी १८ जानेवारीला मतदान.

शिरुर (कासार)

एकूण जागा १७

ओबीसी राखीव ४

१३ जागांसाठी ३७ उमेदवार आपले भविष्य आजमावत आहेत.

भाजप, महाविकास आघाडीत लढत आहेत.

माजी मंत्री सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब अजबे यांच्यात लढत आहे.

ओबीसी राखीव ४ जागेसाठी १८ जानेवारीला मतदान होत आहे.

आष्टी

एकूण जागा १७

ओबीसी राखीव ४

१३ जागांसाठी ४२ उमेदवार भविष्य आजमावत आहेत.

भाजपा-राष्ट्रवादीमध्ये लढत आहेत.

भाजपा आमदार सुरेश धस राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब अजबे यांची प्रतिष्ठापणाला.

४ जागेसाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com