अमर घटारे, अमरावती
अमरावती: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग (Fire) लागल्याने खळबळ माजली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र दोन बालक यात किरकोळ जखमी झाले होते. त्या दोन बालकांवर सध्या उपचार सुरू आहेत. ही आग लागल्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर दाखल झाले आणि त्यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत सहा-सहा जिल्ह्यात पालकमंत्री स्पायडरमॅन सारखे काम करणार का? असा खोचक टोला लगावला आहे. (Amravati Hospital Fire News)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी जिल्ह्या स्त्री रुग्णालयात NICU मध्ये आग लागल्याची घटना घडली असताना त्यांनी भेट दिली आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सहा जिल्ह्यांना एक पालकमंत्री आहे. ते स्पायडरमॅन सारखे काम करणार का? प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टीचा समन्वय नाही. शासनाची भूमिका स्पष्ट होत नाही. लोकशाहीची थट्टा शिंदे आणि भाजप सरकारकडून होते अशी खरमरीत टीका त्यांनी सरकारवर केली आहे.
दरम्यान ही आग लागल्यानंतर भाजप आमदार आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांनीही या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की प्रवीण पोटे यांनी नाना पटोलेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, शिंदे सरकारमध्ये समन्वय आहे, 100% नियोजन आहे. अमरावतीच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. तसेच जी मदत करता येईल ती मदत करेल असंही पोटे म्हणाले. त्याचप्रमाणे यापूर्वी सुद्धा पटोलेंच्या सरकारमध्ये असताना त्यांच्या काळात आगीच्या घटना घडल्या, आगीच्या घटना कोणाला सांगून येत नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.