Nana Patole , Prakash Ambedkar saam tv
महाराष्ट्र

Akola News : काँग्रेस वंचितचा हात धरणार ? नाना पटाेले म्हणाले...

अकाेला येथील पत्रकार परिषदेत नाना पटाेले बाेलत हाेते.

जयेश गावंडे

Nana Patole : प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांच्याकडून युतीसंदर्भात अजूनपर्यंत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. दरम्यान भारत जोडो यात्रेसाठी प्रकाश आंबेडकर यांना भेटणार नाही. त्यांची काय भूमिका आहे हे समजून घेऊन योग्य ती भूमिका घेणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी स्पष्ट केले. अकाेला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पटाेले बाेलत हाेते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शंका निर्माण होत आहे. ज्यावेळेस शिवसेनेने 16 आमदारांचे पत्र दिले होते, त्यांच्यावर कारवाई करावी त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप केला. त्या प्रक्रियेला थांबविले. त्यानंतर चिन्हाचा वाद आला. त्याच्यातही निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने थांबविले.

या पद्धतीचा संभ्रम न्यायव्यवस्थेने निर्माण करणे हा शंकेचा भाग असल्याचे पटालेंनी नमूद केले. ते म्हणाले खरं तर आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. पण न्याय व्यवस्थेवर संभ्रम निर्माण होणे हा लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे. पटोले पुढं म्हणाले हे सरकार असंविधानिक असून राज्यपाल महोदय हे तर फार विद्वान आहेत. या पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या जमीन अर्जावर आज कोर्टात 3 तास सुनावणी

...तरच मी उपोषण सोडणार; सोनम वांगचुक यांनी सरकारकडे केल्या या २ प्रमुख मागण्या

विद्यार्थ्यांची माफी मागा, राहुल गांधींनी सरकारला ठणकावलं; शिक्षणव्यवस्थेवर ठेवलं बोट, आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांकडं वेधलं लक्ष

Kidney Damage : या ७ सवयी करतात तुमच्या किडनीचं नुकसान, आताच सोडा नाहीतर...

दिल्ली आंदोलनादरम्यान मोठी घडामोड! रुग्णालयात सोनम वांगचुक यांची 2 केंद्रीय मंत्र्यांसोबत 45 मिनिटे चर्चा; बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT