nana patole Saam Tv News
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : हे पाप सरकारनं केलंय; लाडक्या बहिणीवरून काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Congress leader attacks Mahayuti government: जो आकडा समोर येत आहे, त्यापेक्षा जास्त अपात्र लाडक्या बहिणी आहेत, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा खळबळजनक दावा. महायुती सरकारवरही केली टीका.

Bhagyashree Kamble

मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरली. लोकसभेच्या धक्कादायक निकालानंतर विधानसभेत महायुतीनं ही योजना आणली. कोट्यवधी लाभार्थी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. एकीकडे योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे २१०० रूपये कधी मिळणार याच्या प्रतिक्षेत लाडक्या बहिणी आहेत. यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोलही केला होता. दरम्यान, घुसखोरी करून भारतात आलेली बांगलादेशी महिला देखील सरकारची लाडकी बहीण ठरली. या योजनेच्या कारभारावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. या सरकारनं खोटे आश्वासन देऊन आपली सत्ता कशी येईल यासाठी काम केलं असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय.

लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेचे बाण सोडले. अशातच काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित करीत महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलंय. 'महायुती सरकारनं खोटे आश्वासन देऊन आपली सत्ता कशी येईल यासाठी काम केलं आहे. जनतेच्या घामाचा पैसा अपात्र लाभार्थ्यांना वाटला आहे. सरकारचे मंत्री तसे भाष्य करत असल्याचा धक्कादायक खुलासा नाना पटोले यांनी केला आहे.

३० लाख अपात्र लाडक्या बहि‍णींना लाभ मिळत असल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये करण्यात आला होता. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. 'निवडणूक जिंकण्यासाठी महायुती सरकारनं हे पाप केलं आहे. खरंतर जनतेच्या पैशांची सुरक्षा करणे आणि हिताचे निर्णय घेणं हे या सरकारचं काम होतं. पण मागेल त्या बहि‍णींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जो आकडा समोर येत आहे, त्यापेक्षा जास्त अपात्र लाडक्या बहिणी आहेत', याची माहिती देखील नाना पटोले यांनी दिली आहे.

सरकारने त्रुटी धोके समजून आंधळं होऊन हा निर्णय घेतलाय. सरकार हे दोषी असल्यामुळे सरकारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केलीय. सरकारनं २१०० रूपये लाडक्या बहि‍णींना देण्याचं जाहीर केलं होतं. सरकारने निवडणुकीसाठी घेतलेला हा निर्णय होता. या पद्धतीचे बोगस लाभार्थी दाखवून संख्या कमी करण्याचे काम हे सरकार करत आहे. बांगलादेशींना देखील या योजनेचा लाभ मिळत आहे. विधानसभेत याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल आम्ही प्रश्न उपस्थित करू, असंही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT