नाना पटोलेंनी केली देवेंद्र फडणवीसांवर 'हि' टीका...  Saam Tv
महाराष्ट्र

नाना पटोलेंनी केली देवेंद्र फडणवीसांवर 'हि' टीका...

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राजे व अधिकारी वाजे आहेत अशी टीका केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले Nana Patole हे धुळे Dhule जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी संध्याकाळी उशिरापर्यंत पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राजे व अधिकारी वाजे आहेत अशी टीका केली होती.

या टीकेला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे त्यांच्या स्वतःच्या कार्यकाळातील अनुभव सांगत आहेत, अर्णव च्या मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीस यांना सीडीआर कसा मिळाला त्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर ते घाबरले होते. यामुळे मंत्री राजे व अधिकारी वाजे हे त्यांनाच जास्त माहीत असल्याची टीका नाना पटोले यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

हे देखील पहा -

नाना पटोले हे शुक्रवारी दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला असून विधानसभा अध्यक्षांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी तसेच भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत त्याबाबत पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

आपली खुर्ची वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान झाले असून संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान बीजेपी मुळे झाले असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्यामागे देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar Yadav: सूर्यकुमारला डबल धक्का; BCCI नंतर मुंबई इंडिन्यसही साथ सोडणार?

Maharashtra News Live Update: सातारा महामार्गावर एसटी बसचा अपघात

सुनेत्रा पवारांनी छगन भुजबळांना खासदारकी का दिली नाही? समोर आले 'हे' मोठे कारण, वाचा इनसाईड स्टोरी

Gautami Patil-Bhau Kadam : 'हिल हिल पोरी हिला...'; गौतमी पाटील अन् भाऊ कदम यांच्या केमिस्ट्रीची जादू, पाहा Unseen Photo

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 92% ते 283% पर्यंत वाढ होणार? सरकार किती वाढवणार फिटमेंट फॅक्टर? वाचा...

SCROLL FOR NEXT