सुरज सावंत
मुंबई : संपूर्ण देशभर गाजलेल्या सचिन वाझे Sachin Waze प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. सचिन वाझे याला इतर मार्गातून मिळणाऱ्या मालमत्तांचे स्त्रोत जाणून घेण्यासाठी एसीबी हि चौकशी करणार आहे. ACB launches open probe against Sachin Waze
या खुल्या चौकशीसाठी ACB मुंबई पोलिसांकडे Police सविस्तर परवानगी मागितली होती. सरकारी कर्मचाऱ्याची चौकशी करण्यासाठी संबंधित विभागाकडे परवानगी मागणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने ही परवानगीची Permission मागणी गृह विभागाकडे व मुंबई पोलिसांकडे पाठवण्यात आली होती.
हे देखील पहा -
पण वाझेंना आता पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाईसाठी पोलिस दलाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता एसीबीने सचिन वाझे विरोधात खुली चौकशी सुरू केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यापूर्वीही वाझे विरोधात बेकायदा संपत्ती जमा केल्याप्रकरणी दोन तक्रारी एसीबीला आल्या होत्या.
टीआरपी प्रकरणात तत्कालीन तपास अधिकारी सचिन वाझे याने 30 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालय (ईडी) तपास करत आहेत. बार्कच्या अधिकाऱ्यांनी वाझेला लाच दिल्याचा जबाब ईडीला दिला आहे. बार्कने बँक खात्यात एक बनावट नोंद केली आहे. त्यांच्या जागेवर बांधकाम होत आहे, त्यासाठी एका बनावट कंस्ट्रक्शन कंपनीकडे पैसे हस्तांतरित केल्याची नोंद त्यांच्या वही खात्यात आहे. त्यात हवाला ऑपरेटरचाही वापर झाल्याचे बोलले जात आहे. वाझेच्या असंपदेबाबत होत असल्या आरोपांसंदर्भात एप्रिल महिन्यात खुली चौकशी करण्याची परवानगी एसीबीने गृहविभागाकडे मागितली होती.
या पूर्वी वाझे विरोधात भ्रष्टाचार व बेहिशोबी मालमत्ता या दोनही तक्रारी होत्या. त्यातील त्यातील पहिली तक्रार ख्वाजा युनुसप्रकरणी निलंबीत झाल्यानंतर एसीबीला प्राप्त झाली होती. तर दुसरी तक्रार ही निनावी असून ती वाझे यांनी पुन्हा पोलिस दलात सामील झाल्यानंतर प्राप्त झाली होती. बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी ही तक्रार आहे.
यापूर्वी निनावी तक्रारींची एवढी दखल घेतली जात नव्हती. पण 2015 मधील परिपत्रकानुसार अशा प्रकरणांची नोंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार वाझेविरोधात आलेल्या निनावी तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. पण दोनही तक्रारींमध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.