Nana Patole, Barsu Refinery Project, CM Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

Nana Patole On Barsu Refinery Project Protest : बारसूत जालियनवाला बाग हत्याकांड सारखा प्रकार घडविण्याचा सरकाराचा प्रयत्न : नाना पटाेले (पाहा व्हिडिओ)

बारसू प्रकल्प हाेता स्थानिकांचा विचार घ्यावा असे पटाेलेंनी नमूद केले.,

संजय डाफ

Nana Patole On Barsu Refinery Project Protest : महाराष्ट्रातील सरकारला जनतेचे काही घेणे देणे नाही, हम करे सो कायदा असे हे सरकार वागत असल्याची टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले (nana patole) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बारसू प्रकल्पाच्या आंदाेलकांवरील (barsu refinery latest update) कारवाईच्या अनुषंगाने केली. पटाेले म्हणाले मी स्वतः बारसु प्रकल्पाला भेट दिली होती. या प्रकल्पाच्या शेजारी सत्ताधारी पक्षातील बगलबच्छांनी जमिनी खरेदी केल्याचे नमूद केले. (Breaking Marathi News)

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला विराेध करणा-यांवर आज आंदोलनाचा दुस-या दिवशी पाेलिसांच्या बळाचा वापर सुरु झाल्याचे दिसून येत आहे. पाेलिस आणि आंदाेलकांमध्ये हमरीतुमरी हाेत असताना दिसून येत आहे. खून झाला तरी चालेल, मेलाे तरी चालेल आम्ही लढणार मागे हटणार नाही अशी भूमिका बारसू प्रकल्पाला विराेध करणा-या ग्रामस्थांनी घेतली आहे.

आमदार नाना पटाेले यांनी बारसूतील आंदाेलकांवरील कारवाईचा निषेध केला. ते म्हणाले राज्यातील सरकार हे बिल्डर आणि उद्योगपतींचे सरकार आहे. त्यामुळं बारसुमध्ये बळजबरी केली जात आहे. पत्रकारांनी आवाज उठविल्यावर त्यांचा खून केला जातो. अशा घटना काेकणात घडल्या हे दुर्देवी आहे.

आम्ही प्रकल्पाविरोधात नाही, मात्र स्थानिकांना विश्वासात घेतले नाही. हे सरकार असं का वागत आहे, हा प्रश्न आहे. खरंतर सरकारने मध्यस्थी करावी असे म्हणत पोलीस अशा प्रकारे आंदोलन चिरडण्याचं काम करत असेल तर जालियनवाला बाग सारखा प्रकार घडू शकतो अशी भिती पटाेलेंनी व्यक्त केली.

पटाेले पुढं बाेलताना म्हणाले खारघरमध्ये जसे हत्याकांड घडविले तसे हत्याकांड बारसुमध्ये घडू शकते. आमचा प्रकल्पाला विरोध नाही, मात्र सरकारच्या बगलबच्चे यांना फायदा पोहचविण्यासाठी, त्यांना जास्त भाव पोहचविण्याच प्रयत्न करत आहे काँग्रेस कोण मुख्यमंत्री होईल हे बघत नाही तर राज्यातील राज्यातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करते. खारघरमध्ये घटना घडल्यावर काही मंत्री विदेशात पळून गेले. राज्य सरकार जनतेला चिरडून टाकण्याचं काम करत आहे. आज संविधान धोक्यात आहे, त्यामुळं हे भाजप विरोधात असेल त्यांच्या सोबत जाऊन लढा देऊ असे पटाेलेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT