ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य (पहा व्हिडीओ)
ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य (पहा व्हिडीओ) Saam TV
महाराष्ट्र

ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य (पहा व्हिडीओ)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकः मागील काही दिवसांमागून वादग्रस्त वक्तव्ये करत असल्याने राजकारणामध्ये (Politics) राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची जीभ परत एकदा घसरली आहे. ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर करून त्यांनी परत एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. नाना पटोले यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी (Igatpuri) येथे सुरू असलेल्या काँग्रेस (Congress) प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली होती. मात्र, जाता- जाता परत एकदा त्यांनीच आपल्याच वादग्रस्त वक्तव्याचा वाद क्षणाचा देखील वाट न बघता, त्यात परत एकदा एक काडी टाकली आहे. (nana patole bjp pm narendra modi Controversial statement)

हे देखील पहा-

यामुळे येणाऱ्या काळात नाना पटोलेविरुद्ध भाजप असे चित्र राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे. नाना पटोलो यांनी काही दिवसाअगोदरच पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसा व्हिडिओ (Video) देखील व्हायरल (Viral) झाला होता. त्यात ते म्हणतात, “मी का भांडतो? मी आता गेल्या ३० वर्षापासून राजकारणात आहे. लोक ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकत असतात. शाळा (School), कॉलेज हे करुन आपल्या एक- दोन पिढीचा उद्धार करुन टाकत असतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणामध्ये एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करत राहिलो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधामध्ये प्रचाराला आले होते.

एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे...”असे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचे व्हिडीओ बघायला आणि ऐकायला मिळत आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देत असताना पटोले यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, काही भागामध्ये निवडणुका (Elections) चालू आहेत. आमच्या भागात मोदी नावाचा एक गावगुंड आहे. त्याची तक्रार गाववाले (villagers) करत होते. मी त्यांना सांगत होत की घाबरू नका मी तुमच्या बरोबर आहे. आणि मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. यावर ते वाक्य आहे. (nana patole bjp pm narendra modi Controversial statement)

पंतप्रधान मोदींविषयी ते वाक्य नाही. या प्रकरणाचा बाऊ केला जात आहे, तर भाग वेगळा आहे. तुम्ही तो व्हिडीओ बघा, त्यामध्ये लोकांच्या तक्रारीनंतर लोकांमध्ये मी बोलो आहे. मी कुठल्या भाषणात मी हे बोलो नाही. गावगुंडाची तक्रार लोक करत होते आणि त्यांना मी आश्वस्त करत होतो. त्या व्हिडीओमध्ये मी पंतप्रधानांचा उल्लेख केला नाही किंवा नरेंद्र असा शब्द देखील वापरला नाही. मोदी नावाचा गावगुंड आहे, त्याविषयी मी बोललो आहे, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.

नाना पटोले इगतपुरी येथे म्हणाले की, गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहेत. त्यांची आता हलाखीची परिस्थिती झाली आहे. लोक भाजपवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते, असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिले आहे, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकात पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. पुढे ते म्हणाले की, नाना पटोले म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांची अनेक वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता राहिली आहे. भाजप हा आमचा मुख्य शत्रू आहे. यामुळे आमची त्याच पद्धतीची भूमिका आणि रणनीती राहणार आहे, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT