Controversy erupts in Maharashtra after a viral government letter allegedly labels BJP MLA Narendra Mehta as a ‘land mafia’. Saam Tv
महाराष्ट्र

भाजप आमदार नरेंद्र मेहता भूमाफिया? व्हायरल पत्रामुळे भाजपची कोंडी?

Nana Patole Bjp Mla Narendra Mehta Land Mafia Letter Row: राज्यात भूमाफियांचा सुळसुळाट असतानाच आता नाना पटोलेंनी नवा बॉम्ब फोडलाय... भाजप आमदार नरेंद्र मेहता भूमाफिया असा उल्लेख असलेलं सरकारी पत्रच समोर आणलयं...या पत्रात नेमकं काय आहे? विरोधकांनी भाजपला कसं घेरलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

हेच ते पत्र....ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय...कारण याच पत्रात भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख करण्यात आलाय... आणि मेहतांचा भुमाफिया असा उल्लेख दुसरा तिसरा कुणी नाही तर खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलाय...मेहतांवर राजकीय आरोप करण्यात आल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय. तर या पत्रातील भूमाफिया असा उल्लेख हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा दावा नरेंद्र मेहतांनी केलाय.

असं असलं तरी ज्या व्हायरल पत्रावरुन राजकीय वादळ उठलंय... त्या पत्रात आमदार नरेंद्र मेहतांचं नाव घेत कोणते आरोप करण्यात आलेत...पाहूयात... व्हायरल पत्रात आमदार मेहतांवर काय आरोप? भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेची पर्यायाने शासनाच्या थकीत महसुलाची जलद वसुली करण्यात यावी अमोल रकवी, अजय धोका आणि विकास पाटील यांच्या ई-मेलवर आलेल्या निवेदनाची प्रत जोडली आहे. शासन निर्णयानुसार 7 दिवसांत चौकशी करण्यात यावी

आता सरकारी पत्रात भाजपच्या आमदाराचाच भूमाफिया असा उल्लेख समोर आल्यानं विरोधकांनी सरकारला घेरलंय... तर हे पत्र सभागृहात मांडण्याचा इशारा नाना पटोलेंनी दिलाय...त्यामुळे सरकारी पत्रातील भाजपच्या आमदाराच्या भूमाफिया उल्लेखावरुन राजकारण आणखीच तापण्याची चिन्हं आहेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आजच्या दिवशी भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा शुक्रवार कोणत्या राशींसाठी ठरणार लकी

Maharashtra News Live Update: यवतमाळात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी युवा संवाद

IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

SCROLL FOR NEXT