भाजपला संघ अशा प्रकारचे शिक्षण देतं- नाना पटोले
भाजपला संघ अशा प्रकारचे शिक्षण देतं- नाना पटोले  Saam Tv
महाराष्ट्र

भाजपला संघ अशा प्रकारचे शिक्षण देतं- नाना पटोले

अॅड. जयेश गावंडे

अकोला - पुणे Pune येथिल भाजप BJP आमदार यांनी मनपा महिला अधिकारी यांना केलेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ प्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आनंद अडसूळ आणि त्यांच्या मुलाला ईडीने लावलेल्या चौकशिबाबत काँग्रेसचे Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी तीव्र प्रतिक्रिया देत भाजप व त्यांनी केलेल्या तपास यंत्रणेवर घणाघाती आरोप केले आहे.

शहरात सिटी कोतवाली चौकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मोटारसायकल रॅलीत सहभागी असताना बोलत होते. भाजपच्या आमदारांनी महिला अधिकाऱ्यांवर केलेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ प्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपची ही परंपरा आहे. त्यांचं जो मूळ संघ आहे, त्यामध्ये या पद्धतीचे शिक्षण दिले जाते. महिलांचा सन्मान हा भाजपमध्ये नाही. हा एकच आमदार नाही साटम आणि पंढरपूरचा आमदार परिचारक यांचाही त्यात समावेश आहे. परिचारक यांनी तर जे आपल्या देशाचा संरक्षण करतात त्यांच्या महिलांच्याबद्दल अपशब्द काढले होते. या भाजपला महिलांच्या बद्दलचा किती सन्मान आहे हे यावरून वारंवार सिद्ध होत आहे. भाजप जसे मागासवर्गीय आणि आरक्षणाच्या विरोधात आहेत तसं महिलांच्याही विरोधात भाजप आहे हे यावरून सिद्ध होते, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.

तसेच त्यांनी सेनेचे माजी खासदार आणि नेते आनंद अडसूळ आणि त्यांच्या मुलांची चौकशीसंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, मी वारंवार सांगतोय ईडी आणि सीबीआय याचा दुरुपयोग जेव्हा भाजप केंद्रसरकारमध्ये आले तेव्हापासून या दोन्ही तपास यंत्रणेचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम आपण पाहतो आहे; ईडी आणि सीबीआय हे फार मोठं संकट आहे, हे फार मोठा तपास करीत आहे, असे कुठलंही कारण आता राहिलं नाही.

केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआय ज्यांच्यावर लावले त्यांना अजूनपर्यंत कुठलीही शिक्षा झालेली नाही. भुजबळ हे मागासवर्गीय नेते होते. म्हणून फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांना दोन वर्षे जेलमध्ये टाकून ठेवलं. पण उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले आहे. याचाच अर्थ सत्तेचा दुरुपयोग करून विरोधी लोकांना इंग्रजांसारखं, हुकूमशहा सारखं या देशांमध्ये ईडी आणि सीबीआयचा वापर करून ते त्या पद्धतीचा उपयोग करत आहे. अडसूळ यांना नोटीस आली असेल त्याला आता कोणालाही घाबरण्याचे कारण नाही, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेचे स्वागत करतो केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या कामगार विरोधी धोरणाच्या महागाईच्या विरोधात बेरोजगारीची वाढवली हे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज त्याचा जो बंद आहे त्याच्यामध्ये देशातील जनता सहभागी झाली आहे असेही नाना पटोले म्हणले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

SCROLL FOR NEXT