Bhandardara Dam 
महाराष्ट्र

भंडारदरा धरणाला क्रांतिवीर राघोजी भांगरेंचे नाव

साम टीव्ही न्यूज .

अहमदनगर : ऑगस्ट क्रांतिदिनी महात्मा गांधींनी ‘चले जाव’ची हाक दिली. याच दिवशी आज ‘विल्सन चले जाव’ ही घोषणा देऊन आपण ‘विल्सन डॅम’चे नाव ‘क्रांतिवीर राघोजी भांगरे धरण’ करीत आहोत, असे सांगतानाच माजी मंत्री मधुकर पिचड यांनी, मुख्यमंत्री उद्धवजी, तुमच्या वडिलांचे नाव जसे मुंबईत दिले, तसे आमच्या समाजाचे राघोजी हे वडील आहेत. त्यांचे नाव भंडारदरा जलाशयाला सरकारने कागदोपत्री द्यावे, अशी मागणी भंडारदरा येथे नामकरणविधी कार्यक्रमप्रसंगी केले. Naming of Bhandardara Dam as Raghoji Bhangre

भंडारदरा जलाशय परिसरात आदिवासी संघटना व समाजाने एकत्र येत पारंपरिक वाद्यांच्या गजरात व ‘राघोजी भांगरे की जय’ अशा घोषणा देत ‘क्रांतिवीर राघोजी भांगरे धरण’ फलकाचे अनावरण माजी मंत्री पिचड यांच्या हस्ते केले. तीन तास मिरवणूक झाल्यानंतर कार्यक्रमास सुरवात झाली.

प्रास्ताविक काळू गोडे यांनी केले. आदिवासी उन्नती संस्थेचे अध्यक्ष भरत घाणे, मंगलदास भवारी, हेमलता पिचड, डॉ. घनकुटे, माधव गभाले, सी. बी. भांगरे, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, गिरजाजी जाधव, सीताराम भांगरे उपस्थित होते.

याप्रसंगी भाजपचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड म्हणाले, ‘‘क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव जलाशयाला देणे योग्यच आहे. येथील आदिवासी धरणासाठी विस्थापित झाला. जल, जंगल, जमीन यांचा तो हक्कदार असून, त्यांच्या पूर्वजाचे नाव जलाशयाला का नको? तालुक्यातील नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वांच्या मागणीमुळे व माजी मंत्री पिचड यांच्या सूचनेवरून आम्ही विल्सन जलाशयाला क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव देत आहोत. यात राजकारण आणू नका.’’

तहसीलदार मुकेश कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, पाटबंधारे विभागाचे अभिजित देशमुख यांना लेखी निवेदन देऊन धरणाच्या भिंतीवर ‘क्रांतिवीर राघोजी भांगरे जलाशय’ असा फलक लावण्यात आला. Naming of Bhandardara Dam as Raghoji Bhangre

आमदार लहामटेंसमोर घोषणाबाजी

मिरवणूक सुरू असताना आमदार डॉ. किरण लहामटे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जात असताना घोषणाबाजी सुरू झाल्याने, काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT