लातूर ः लातूर जिल्ह्यातील औसा शहरातील नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामाचा प्रारंभ व लोकार्पण नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे हे देखील उपस्थित होते. औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी मागील काळामध्ये औसा शहरात केलेल्या विविध विकासकामांचा प्रारंभ यावेळी करण्यात आला. Dispute between Shiv Sena and NCP in Ausa municipality
शहरातील भोई गल्लीतील प्रलंबित रस्त्याच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. औसा येथील नगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असताना महत्त्वाच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांना प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांगितले. तरीही उदासीनता दिसून येते. यामुळे विकासकामे करताना महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे आवाहन सेनेच्या नेत्या जयश्री उटगे यांनी केला आहे.
औसा इथं मराठा भवन या इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रम नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. दरम्यान हा कार्यक्रम संपल्यानंतर तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये औसा विभागांतर्गत उर्जा विषयक कामांच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. ही बैठक आटोपून परताना शिवसेनेच्या महिला नेत्या जयश्री उटगे व अन्य शिवसैनिकांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना औसा शहरातील भोई गल्ली येथील रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून खोदलेल्या अवस्थेत असल्याचं त्यांनी राज्यमंत्री तनपुरे यांना सांगितलं.
तहसीलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या भोई गल्लीतील रस्त्याची दूरावस्था राज्यमंत्र्यांनी स्वतः पाहण्याची विनंती त्यांनी केली. यापूर्वी शिवसेनेच्या नेत्या उदगिरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहरातील या भोई गल्ली रस्त्याच्या बाबतीत राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष असलेले डॉक्टर अफसर शेख कशा पद्धतीने कामाचे टाळाटाळ करतात. रस्त्याचं दुरुस्तीचं काम प्रलंबित ठेवणे याबाबत बारामती येथे जाऊन अजित पवार यांच्याकडे कारणा मांडला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष अफसर शेख यांना सदरचे काम तातडीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण सहा महिने उलटूनदेखील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांनी अजित पवारांनी दिलेल्या आदेशालादेखील केराची टोपली दाखवल्याचेचा आरोप शिवसेनेच्या नेत्या जयश्री उटगे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर मांडल्या. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीदेखील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांना तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा व लोकांची गैरसोय टाळावी अशा सूचना केल्या. Dispute between Shiv Sena and NCP in Ausa municipality
आगामी काळामध्ये औसा नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्याने विकासकाम केल्याचा दावा राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष करीत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या जयश्री उटगे या महाविकास आघाडीचा धर्म पाळा व नागरिकांना मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करीत आहेत. आता भोई गल्लीतील रस्त्याबाबत नगराध्यक्ष काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.