साप  Saam Tv
महाराष्ट्र

महिला पोलिसाने हात धुण्यासाठी खिडकीबाहेर काढला अन् साप चावला!

नालासोपारा पोलीस ठाण्यात रुजू असणाऱ्या महिला पोलीस शिपाई पूजा राठोड (३०) यांना सर्पदंश झाला आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई-विरार : नालासोपारा पोलीस ठाण्यात रुजू असणाऱ्या 30 वर्षीय महिला अंमलदाराला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली आहे. खिडकीतून हात बाहेर काढून धूत असताना साप चावला आहे. पण हा साप कोणत्या जातीचा आहे हे मात्र समजू शकलेले नाही.

हे देखील पहा :

मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पोलीस ठाण्यात रुजू असणाऱ्या महिला पोलीस शिपाई पूजा राठोड (३०) यांना सर्पदंश झाला आहे. हि घटना रविवार (दि.२१) रोजी घडली आहे. दुपारच्या वेळी जेवण करण्यासाठी पूजा राठोड या खिडकीतून हात धुवत असताना त्यांच्या हाताला सर्पदंश झाला.

मात्र, त्यांना हि गोष्ट समजून आली नाही. सर्पदंश झाल्याचा इतर पोलिसांना अंदाज आला आणि तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नालासोपारा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रल्हाद जोशींनी शिक्षण मंत्री पदाचा पदभार स्वीकारला

Lose Belly Fat : दैनंदिन जीवनातील 'या' चुका टाळा; पोटाची चरबी झटपट होईल कमी अन् कंबर दिसेल स्लिम

शिवाजी पार्कात तरुणाईचा महासागर! विजयी सभेत राज ठाकरेंनी जिंकली मनं; मनसे प्रमुखांनी नेमकं काय केलं?

Famous Actress : सिगारेटचा चटका दिला, वाटेल तिथे स्पर्श केला; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

IDA Hike: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १ जुलैपासून महागाई भत्ता वाढला, जाणून घ्या किती वाढणार पगार

SCROLL FOR NEXT