Nallasopara News  Saam Tv
महाराष्ट्र

Nallasopara : नालासोपाऱ्यात पुन्हा इमारतीचा स्लॅब कोसळला; अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू

नालासोपारा येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळ्याची घटना समोर आली आहे.

चेतन इंगळे

NallaSopara News : नालासोपारा येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळ्याची घटना समोर आली आहे. या घटनेत ३५ हून अधिक लोक अडकली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या मदतीने सुरू आहे. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकने दिली आहे. सदर घटनेवने पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Latest Marathi News)

नालासोपारा (Nallasopara) पुर्वेच्या तुळींज परिसरातील साई निवास या एक मजली चाळीचा रविवारी सकाळी १० च्या सुमारात बालकनीचा भाग अचानक कोसळून खाली आला. यावेळी या वरांड्यात कुणी नसल्याने या अपघातात कुणी सापडले नाही. पण या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर २१ सदनिका तर तळ मजल्यावर १० सदनिका आहेत.

रविवार असल्याने बहुतांश नागरिक घरात असल्याने दारासमोर स्लॅब कोसळल्याने घरातच अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.

या बाबत माहिती देताना पालिकेच्या सहायक आयुक्त विशाखा मोटघरे यांनी माहिती दिली की, सदर घटनेत कुणीही जखमी झाले नाही. सर्व रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

सदरची इमारत धोकादायक इमारत घोषित केली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर रहिवाशांनी सहरची इमारत ही २५ वर्षे जुनी असल्याची माहिती दिली. यामुळे ही इमारत धोकादायक असतानाही पालिकेच्या यादीत याची कोणतीही नोंद नसल्याने शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

PM Modi : ६ दिवस, ५ देश... पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Mumbai : मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; बेकरी मालकाचं भयंकर कृत्य

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT