Police Saam Tv
महाराष्ट्र

Nalasopara Crime News : 'लिव्ह-इन'मधील महिलेची हत्या केली, मृतदेह बेडमध्ये लपवला; पळून जात असताना धावत्या ट्रेनमध्येच...

आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या बेतात असताना नागदा रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेतले आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन इंगळे

Nalasopara Crime News : नालासोपाराच्या तुळींज येथील मेघा शहा हत्याप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. ४० वर्षीय पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी जीआरपीच्या मदतीने अटक केली आहे. आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या बेतात असताना नागदा रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेतले आहे. (Latest Nalasopara News)

पतीला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणी मोठा खुसाला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे पती पत्नी नसून ते लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र बाहेरील दुनियेला आपण पती पत्नी असल्याचं सांगत होते. दोघांमध्ये पैशांवरून नेहमी वाद होऊन भांडण होतं असायचे. रोजच्या भांडणाला पती कंटाळला होता. त्यामुळे शेवटी त्याने टॉव्हेलने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली, असा संशय पोलिसांना आहे.

हार्दीक शहा असे या आरोपी पतीचे नाव आहे. त्याने मेघाची हत्या नेमकी का व कोणत्या कारणामुळे केली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

तुळींज येथे सोमवारी संध्याकाळी सीता सदन या इमारतीत मेघा शहा (वय ४०) या महिलेची हत्या झाली. हत्या करून तीन ते चार दिवस मृतदेह बेडमध्ये ठेवला होता. चार दिवस लोटल्यानंतर मृतदेह कुजण्यास सुरूवात झाली होती. कुजल्याचा वास येत असल्याने काहीतरी चुकीचे घडत असल्याचं शेजाऱ्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना या बाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यावेळी घरात बेडमध्ये कुजलेल्या अवस्थेत मेघाचा मृतदेह सापडला. तिचा पती फरार असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी टीममधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. आरोपी पती दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने जीआरपीच्या मदतीने धावत्या ट्रेनमधून त्याला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

Face Care: चाळीशीतही २५ वर्षांच्या मुलीप्रमाणे ग्लो हवा आहे? मग घरी तयार केलेला 'हा' अँटी-एजिंग फेस मास्क नक्की ट्राय करा

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

SCROLL FOR NEXT