रणजित माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी
dead body found in Kolhapur forest : कोल्हापुरात जंगलात निवस्त्र मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मनेरमळा परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा निर्घृण खून (Brutal Murder in Kolhapur) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूरमध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनेरमळा परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आज सकाळी मृतदेह आढळला. डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर मारहाणीचे व्रण होते. या खूनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती.
सोमवारी सकाळी मनेरमळा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह (Dead Body Found) आढळून आला. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. मृताच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमांच्या खुणा आहेत. त्यामुळे बेदम मारहाण करून संपवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (Kolhapur Police Investigation) वर्तवला आहे. खून नेमका कशामुळे झाला याचाही पोलिसांकडून तपास सुरू झालाय.
घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. जंगलात आढलेला मृतदेह कुणाचा आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. हा खून कोणी आणि कोणत्या कारणाने केला, याचा तपास पोलिसांकडून वेगात करण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांनी दिली आहे. पण या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण आहे.
कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती?
कोल्हापुरात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होतेय का असा सवाल आता उपस्थित होत आहे. भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून अद्यापही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संविधान हक्क संघर्ष समितीच्या वतीने आज कोल्हापुरातील दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. इतकंच नाही तर आंदोलकांनी माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या कुटुंबीयांसह कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर आणि त्यांचा मुलगा पारस महेश पिळणकर उपस्थित होते. यावेळी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तातडीने चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली. दरम्यान, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महेश पिळणकर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सांगत कुटुंबीयांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.