Nahsik News Saam TV
महाराष्ट्र

प्रवाशांच्या जीवाशी खेळ का? एक्सलेटरला दोरी लावून ड्रायव्हर चालवतोय बस; नियंत्रण सुटल्याने बस थेट पोलवर

बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही बस एका विद्युत पोलवर आदळली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख -

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) शिखरेवाडी कॉर्नर, पासपोर्ट ऑफिससमोर शिवशाही बसचा (Shivshahi Bus) मोठा अपघात झाला आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही बस एका विद्युत पोलवर आदळली आहे. हा अपघात इतका भयानक होता की विद्युत पोल अक्षरशः अर्धा गाडी खाली जाऊन पूर्ण वाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकवरून (Nashik) नाशिकरोडच्या दिशेने जाणारी शिवशाही बस ही शिखरेवाडी कॉर्नर, पासपोर्ट ऑफिससमोर असलेल्या लाईटच्या पोलवर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने आदळली. मात्र, सुदैवाने विद्युत तारांचा आणि बसचा संपर्क न झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पाहा व्हिडीओ -

बसमध्ये जवळपास 55 ते 60 प्रवाशी होते ते सर्व सुखरुप आहेत. मात्र, बसचा धक्का समोरच्या एका रिक्षाला लागल्याने रिक्षाचालक व बसमध्ये असलेल्या दोन मुली व काही प्रवाशांना दुखापत झाली आहे. दरम्यान, मिरची हॉटेलच्या समोर झालेल्या अपघातात तेरा जणांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर ही मोठी दुर्घटना होताहोता वाचली आहे.

बस चालकांचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ -

धक्कादायक बाब म्हणजे बसमधील एक्सलेटरला वायर नसल्यामुळे ड्रायव्हर दोरीच्या साह्याने बस चालवत होता. शिवाय एक्सलेटरला बांधलेले दोरी नागरिकांना दिसताच त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर बसचालक अशा प्रकारचा निष्काळजीपणा करूनही वाहतूक पोलीस अधिकारी कारवाई करण्यास असमर्थ असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: मनमाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

Horoscope: आजचा दिवस आनंद, सुख समृद्धीचा; ६ राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT