Nagpur Zilla Panchayat Samiti Elections Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Election: नागपूर जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला भोपळा; काँग्रेस 10 तर राष्ट्रवादी 3 जागांवर विजयी

Nagpur Zilla Panchayat Samiti Elections: विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपकडे असलेल्या कुही आणि कामठी या जागाही भाजपने गमविल्या आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Election News: नागपूर जिल्हा पंचायत समितीतील सभापती आणि उपसभापती निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा धुव्वा उडाला आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील 13 पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीचा (Election) निकाल जाहीर झाला आहे. यात काँग्रेसने 10 तर राष्ट्रवादीने 3 जागांवर विजय मिळवला आहे. तर, सत्तधारी भाजपला याठिकाणी खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपकडे असलेल्या कुही आणि कामठी या जागाही भाजपने गमविल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या नागपूर जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी लागली आहे. (Nagpur Election News)

पंचायत समिती पैकी 9 जागेवर काँग्रेसचा सभापती, 3 जागेवर राष्ट्रवादीचा सभापती तर एका जागेवर शिंदे गटाचा सभापती निवडणूक आला आहे. धक्कादायक म्हणजे पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपची पाटी कोरीच राहिली आहे.

त्यामुळे आता उद्याच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, पारशिवानी, उमरेड, मौदा, कुही व भिवापूर, मौदा या पंचयातीत विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीनेने नरखेड, काटोल व हिंगणा येथे सत्ता स्थापन केली आहे. दुसरीकडे शिंदे गटाला रामटेक पंचायत समितीची सत्ता मिळाली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT