Nagpur Woman Crosses Border Into Pakistan  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: धर्मगुरूला भेटायला गेली, परत आलीच नाही; नागपूरमधील महिला बॉर्डर क्रॉस करून गेली पाकिस्तानात

Nagpur Woman Crosses Border Into Pakistan: नागपूरमधील एक महिला ऑनलाईन ओळख झालेल्या धर्मगुरूला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली. या महिलेने कारगिलमधील शेवटच्या गावातून बॉर्डर क्रॉस करत पाकिस्तानात एन्ट्री केली.

Priya More

नागपूरची एक महिला काश्मीरच्या कारगिलमधील बॉर्डरवरून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. सुनीता (४३ वर्षे ) असं या बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला धर्मगुरूला भेटण्यासाठी गेली होती. या महिलेने बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्था गोंधळात पडल्या आहेत. या महिलेने बुधवारी बॉर्डर ओलांडली आणि लडाखच्या कारगिल जिल्ह्यातील शेवटच्या गावातून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले जात आहे.

नागपूरमधील सुनीताने पीओके बॉर्डर पार केली असून तिला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याचा गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला संशय आहे. सुनीता ही नागपूरच्या कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत कबिरनगरमध्ये राहते. आधी ती एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करायची. पाकिस्तानमधील एका धर्मगुरुसोबत तिची ऑनलाइन ओळख झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

धर्मगुरूशी ऑनलाईन ओळख झाल्यानंतर सुनीताने त्या धर्मगुरूला भेटण्याचे प्रयत्न सुरू केले. अमृतसरच्या अट्टारी चेकपोस्टमधून पाकिस्तानला जाण्याचा तिने यापूर्वी दोनदा प्रयत्न केला. मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणेने तिला परत पाठवले होते. १४ मे रोजी सुनीता तिच्या १२ वर्षीय मुलासोबत काश्मीरला गेली.

कारगिल बॉर्डरवरील शेवटचे गाव 'हुंदरमान' मध्ये ती होती. तिथे मुलाला ठेऊन मी परत येते असं सांगून निघून गेली. जेंव्हा सुनीता परत आली नाही तेंव्हा स्थानिकांनी १२ वर्षीय मुलाला लडाख पोलिसांच्या ताब्यात दिले. सुनीताची मानसिक स्थिती सामान्य नसून नागपूरच्या शासकीय मनोरुग्ण रुग्णालयात तिचे उपचार सुरू असल्याची माहिती सांगितली जात आहे.

मुलाला कपडे घेऊन देतो म्हणून सुनीता घरातून बाहेर गेल्याचे सुनीताची आई निर्मला जामगडे यांनी सांगितले. १२ वर्षीय नातू हा काश्मीर मध्ये पोलिस ठाण्यात असून सुनीता बाबत स्थानिक कपिलनगर पोलिसांकडून विचारणा करण्यात आल्याचे तिच्या आईने सांगितले. सुनीता धर्मगुरूला भेटण्यासाठी बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानात गेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT