Nagpur Violence google
महाराष्ट्र

Nagpur : नागपूरची दंगल नियोजनबद्धच! पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड, आणखी दोन सूत्रधारांना ठोकल्या बेड्या

Nagpur Clash News : नागपूरमध्ये सोमवारी उसळलेली दंगल नियोजनबद्धच असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Nagpur Violence Update : नागपूरमध्ये झालेला हिंसाचार हा नियोजनबद्धच असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. सोमवारी रात्री नागपूरमधील महाल भागात हिंसाचार उफळला होता, हा हिंसाचार नियोजनबद्ध असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी याआधी फहिम खान याला बेड्या ठोकल्या होत्या. यामध्ये आता आणखी दोन सूत्रधारांची भर पडली आहे.

नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड एमडीपी पार्टीचा शहराध्यक्ष फाईम खान याच्यासह पोलिसांनी आणखी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. एमडीपी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्युबवर मोहम्मद शेहजाद खान यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून चौकशी करण्यात येत आहे.

नागपूरमधील महाल आणि हंसापुरी या भागात सोमवारी रात्री घडलेला हिंसाचाराच नियोजन सकाळीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हमीद इंजिनियरने मुजाहिद्दीनसाठी देणग्या गोळा करण्याचे आवाहन केले होते, तसेच त्याने गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचे सोशल मीडिया मीडियावरून आवाहन केल्याचे सायबर पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहेत.

फहिम खानचा जामिनासाठी अर्ज -

नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या फहिम खान हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने सत्र न्यायालयात जामीनसाठी अर्ज केलेला आहे. फहिम खानला अटक केल्यानंतर त्याची प्रकृती खराब असल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर फहिम खानला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. फहिम खान याने सत्र न्यायालयात जामिन्यासाठी अर्ज केला आहे. यावर सोमवारी सुनावणी होणार आहे...या सुनावणी त्याचा जामीन फेटाळला जाण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. कारण की पोलिसांना त्याच्याकडून तपासासाठी पोलीस कोठडी मागण्याची शक्यता अधिक आहे.

नागपूरमध्ये नऊ ठिकाणी अद्याप कर्फ्यू कायम -

सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आज पाचव्या दिवशीही नागपूर शहरातील नऊ पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू कायम आहे. सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यापैकी दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी गुरुवारी नागपूर पोलीस आयुक्तांनी आदेशाद्वारे उठवली.

आज सहाव्या दिवशी उर्वरित नऊ पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे. संचारबंदीमुळे या परिसरातील सामान्य जनजीवनावर याचा परिणाम होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT