Nagpur Violence google
महाराष्ट्र

Nagpur Violence: नागपूर हिंसाचार; कुठे कर्फ्यू तर कुठे-कुठे संचारबंदी उठली

Nagpur Curfew: नागपूर शहरात आज तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली, ज्यामुळे हिंसक घटना घडली. शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Dhanshri Shintre

नागपूर शहरात दंगल उसळल्यानंतर पोलिसांनी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावला होता. यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले होते. तीन दिवसांच्या कर्फ्यू नंतर, आज नागपूर शहरातील काही पोलीस ठाण्यांमध्ये संचारबंदीमध्ये २ तासांची सूट देण्यात आली आहे.

यामध्ये नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सककरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपीलनगर या परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, आज नंदनवन आणि कपीलनगर या ठिकाणांवरील संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आली आहे.

दरम्यान, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या भागांतील संचारबंदी शिथील करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू मिळवता येतील आणि जनजीवन सुरळीत राहील. या शिथीलतेचा कालावधी २० मार्च २०२५ पासून दुपारी १४:०० ते १६:०० या वेळेत असणार आहे. त्यानंतर संचारबंदी पुन्हा पूर्ववत लागू होईल.

कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ येथील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत जसाच्या तशा कायम राहील. नागरिकांनी कर्फ्यूचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम २२३ लागू करून कडक शिक्षा करण्यात येईल. पोलिसांनी या कठोर उपायांचा पालन करण्याचे आदेश दिले असून, शहरातील शांतता राखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT