Nagpur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: २ लाखांसाठी सासरच्यांकडून जाच, नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; लग्नानंतर ३५ व्या दिवशी आत्महत्या

Nagpur Police: नागपूरमध्ये नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. २ लाखांसाठी या विवाहितेला सासरची मंडळी मारहाण करत होते. लग्नानंतर ३५ व्या दिवशी या विवाहितेने आयुष्य संपवलं.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरातून हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येत आहेत. नागपूरमध्ये हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सासरच्यांकडून सतत होत असलेल्या मारहाणीला आणि त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी या महिलेच्या नवऱ्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये हुंडाबळीची घटना समोर आली आहे. नाविवाहितेने लग्नानंतर ३५ दिवसांत सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आयुष्य संपवलं. नागपूरच्या बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मयुरी डाहुले असं आत्महत्या केलेल्या नवविवाहित महिलेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला. हुंड्यापायी आपली सोन्यासारखी मुलगी गमावल्यामुळे मयुरीच्या आई-वडिलांचे रडून रडून बेहाल झाले आहे.

मयुरीचे ठाकरे या तरुणाचा अभिषेक डाहुले या तरुणासोबत २५ एप्रिलला बेला येथे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच अभिषेकचे वडील आणि आईने लग्नात झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी मयुरीकडे पैशाचा तगादा लावलायला सुरूवात केली. मुलीचे लग्न झाल्याने मुयरीच्या आई-वडिलांचा खूप खर्च झाला होता. लग्नाच्या काही दिवसांत सर्व सुरळीत होईल असे त्यांना वाटत होते. मुलीला सासरचे त्रास देत असल्यामुळे मयुरीचे आई-वडील देखील चिंतेत होते.

मयुरीच्या आई-वडिलांनी सांगितले की, 'एक दिवस जावई आणि मुलगी घरी आली. मयुरीने वडिलांना तिला होणाऱ्या रोजच्या मारहाणीची कल्पना आम्हाला दिली नाही. २ लाखांची मागणी होत असल्याचे तिने आम्हाला सांगितले. मयुरीच्या वडिलांनी गटाच्या भीसीचे २० हजार उचलले आणि मयुरीला दिले. थोडा दिलासा मिळेल असे आम्हाला वाटलं. पण आमच्याकडे अतिरिक्त पैसे नसल्याने वडील हतबल होते

सासरच्या मंडळींनी फक्त पैशासाठी मयुरीला प्रचंड त्रास दिला. मयुरीला त्यांनी सतत मारहाण केली. या त्रासाला कंटाळून शेवटी ३० मे रोजी मयुरीने सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर नागपूर पोलिलांनी मयुरीचा नवरा अभिषेक, त्याचा भाऊ, आई- वडील या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT