Nagpur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: मूल होत नसल्याने सासरच्यांकडून छळ, विवाहितेला मारहाण अन्...; लग्नानंतर १४ महिन्यातच संपवलं आयुष्य

Nagpur Police: नागपूरमध्ये विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी नवरा आणि सासूला अटक करण्यात आली.

Priya More

नागपूरमध्ये विवाहितेने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. मूल होत नसल्यामुळे या महिलेचा सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. या छळाला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली. ही घटना नागपूरच्या बुट्टीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील टाकळघाट येथे एका २१ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले. सासरच्यांनी शारीरिक मानसिक छळ करीत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात आहे. ही आत्महत्या नसून हत्याच आहे असा आरोप मृत विवाहितेच्या वडिलाने केला आहे. आरोपी पती आणि तिच्या आईविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मुलीचे वडील रामदास मेघरे यांनी केली आहे.

चैताली मनोज कामडी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. टाकळघाट येथे १७ जून रोजी चैतालीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी हुंडाबळी यासह विविध कलमन्वे गुन्हा दाखल करत बुट्टीबोरी पोलिसानी मनोज कामडीला अटक केली आहे. यात सासू रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांनी दिली.

दरम्यान, 'चैतालीचे १४ महिन्यांपूर्वी मनोजसोबत लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासूनच सासरचे तिचा छळ करत होते. लग्नानंतर सासरच्यांनी तिच्यावर दबाव टाकून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. शिवाय मुलबाळ होत नसल्याने तिला प्रचंड त्रास दिला जात होता. हा त्रास सहन न झाल्याने चैतालीने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आयुष्य संपवलं.',असा आरोप तिचे वडील रामदास मेघरे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Travel : इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत करा किल्ल्यावर भटकंती, 'हे' ठिकाण यादीमध्ये पाहिजेच

Kitchen Hacks : बटाटा ५ मिनिटांत उकडेल, हा सुपर हॅक एकदा नक्कीच वापरा

BJP : आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका, महादेव जानकरांचा भाजपवर घणाघात

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Prajakta Gaikwad Wedding : मुहूर्त ठरला! प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात, शाही विवाह सोहळ्याची पत्रिका पाहा

SCROLL FOR NEXT