Crime: घरासमोर खेळत असताना उचलून नेलं, मामाच्या मुलाकडून ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Bihar Crime: ७ वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर मामाच्या मुलानेच बलात्कार केला. रक्तबंबाळ अवस्थेत या चिमुकलीला तिथेच सोडून तो पळून गेला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Bihar Crime
Bihar CrimeSaam Tv
Published On

बिहारमध्ये ७ वर्षांच्या मुलीवर मामाच्या मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीतामढी जिल्ह्यातील महिंदाबारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात ही घटना घडली. घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षांच्या मुलीला मामाच्या मुलीने उचलून नेले. तिच्यावर एका झोपडीत नेऊन बलात्कार केला. गंभीर अवस्थेत तिला तिथेच सोडून तो निघून गेला. या घनटेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या सीतामढीमधील एका गावामध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या मामाच्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. आरोपी तिला रक्ताळलेल्या अवस्थेत झोपडीतच सोडून पळून गेला. पीडित मुलीला रडताना पाहून काही मुलांनी तिच्या आईला याची माहिती दिली. आरोपी हा पीडित मुलीच्या घराशेजारीच राहतो. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

Bihar Crime
Crime News : स्वत:च्या लग्नात मेव्हण्याच्या बायकोशी नजरानजर, महिन्याभरात तिच्यासोबत फरार; पत्नीला म्हणतो तुझी वहिनी जरा जास्तच...

पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीच्या कुटुंबाने पीडितेच्या आईला धमकावले. मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती आणखी बिघडल्यानंतर कुटुंबीयांनी तिला एसकेएमसीएचमध्ये दाखल केले. या मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

Bihar Crime
Crime: ८ महिन्यांच्या गर्भवतीवर सामूहिक बलात्कार, बंदुकीचा धाक दाखवत हैवानांनी शरीराचे लचके तोडले

या प्रकरणात मुलीच्या आईने तिचा जबाब नोंदवला आहे. तिने पोलिसांना सांगितले की, तिची मुलगी घराजवळ खेळत होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने तिला उचलून नेले. तो या मुलीचा मामाचा मुलगा लागतो. या तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तो मुलीला जखमी अवस्थेत सोडून पळून गेला. मुलीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Bihar Crime
Pune Crime: हातपाय बांधले, तोंडांत बोळा कोंबला...; बालकाश्रममध्ये २ अल्पवयीन मुलांवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार, पुणे हादरले

मुलीला सुरूवातीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिची प्रकृती सुधारत नसल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी एसकेएमसीएच रुग्णालयात हलवण्यात आले. वैद्यकीय ओपी प्रभारी गौतम कुमार साह यांनी सांगितले की, 'मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात एका महिला अधिकाऱ्याने जबाब नोंदवला आहे. जबाबाची प्रत संबंधित पोलिस ठाण्यात पाठवली जाईल.' या प्रकरणाचा तपास बिहार पोलिस करत आहेत.

Bihar Crime
Hingoli Crime : सोन्याचे नकली बिस्कीट पुढे फेकत वृद्धेला लुटले; दिवसा घडलेल्या घटनेने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com