Nagpur To Mumbai Flight Saam TV
महाराष्ट्र

Nagpur To Mumbai Flight: प्रवाशांची लूट; नागपूर ते मुंबई विमान तिकीटांच्या किंमतीत मोठी वाढ

Flight Ticket Rate Increas : गो फर्स्ट या कंपनी उड्डाणे रद्द केल्याने इतर कंपन्यांनी आपल्या तिकीटांच्या दरात अव्वाच्या सव्वा किंमती वाढवल्या आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Flight: झटपट प्रवासासाठी अनेक नागरिक विमान प्रवासाचा पर्याय निवडतात. मात्र गेल्या २ दिवसांपासून प्रवाशांची लूट होताना दिसत आहे. गो फर्स्ट या कंपनीची उड्डाणे रद्द केल्याने इतर कंपन्यांनी आपल्या तिकीटांच्या दरात अव्वाच्या सव्वा किंमती वाढवल्या आहेत. नागरिकांच्या खिशावर याचा मोठा फटका बसलाय. (Latest Marathi News)

२५ ते ३० टक्क्यांनी तिकीटाचे दर वाढले

उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने अनेक नागरिकांनी आधिच काही ठिकाणचे बुकींग करून घेतले होते. मात्र आता तिकीटांच्या दरात तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर (Nagpur) विमानतळावरून (Airport) तिकीटाचे दर सर्वाधिक आकारले जात आहेत. यामध्ये आधी मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी ४,५०० ते ५००० इतके दर आकारले जात होते. आता तिप्पट रक्कम घेतली जात आहे. सध्या १२,००० ते १८,००० रुपयांनी दर वाढवण्यात आलेत.

गो फर्स्टची उड्डाणे रद्द झाल्यानंतर हा गोंधळ सुरू झाला आहे. नागपूर-मुंबईची 6 विमाने रद्द झाली असून 36 ऐवजी 30 विमानाचे संचलन होत आहे. याचा फटका ट्रॅव्हलस एजंटलाही बसला आहे. प्रवाशी आणि एजंट यांमध्ये तिकीटांच्या किंमतीवरून वाद होताना दिसत आहेत.

आठवड्यातून चार दिवस कोल्हापूर- मुंबई प्रवास

कोल्हापूर- मुंबई असा प्रवास आता आणखी सुखकर झाला आहे. कारण ५ एप्रिलपासून विमानसेवेत काही बदल करण्यात आलेत. आठवड्यातील चार दिवस ही विमानसेवा पुरवली जात असून यामध्ये मंगळवार, बुधवार, गुरूवार आणि शनिवारी ही विमानसेवा उपलब्ध आहे.

विमानाची वेळ काय आहे?

मुंबई ते कोल्हापूर

स्टार एअरवेजचे विमान सकाळी १०:३० वाजता मुंबईहून उडाण घेईल. त्यानंतर १ तासात विमान कोल्हापूरला पोहचेल. तसेच पुन्हा तासाभराने विमान मुंबईला येणार आहे.

कोल्हापूर - मुंबई

तर कोल्हापूरहून मुंबईसाठी सकाळी 11.55 वाजता विमानाचे टेक ऑफ होणार आहे अन् मुंबईत 12 वाजून 55 मिनिटांनी लँडिंग होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Shocking : पुण्यात प्रेमीयुगुलाने जीवन संपवले, खडकवासला धरणाजवळ आढळले दोघांचे मृतदेह; परिसरात खळबळ

GK: वर्षात १२ महिने नसून १३ महिने असणारा 'हा' अनोखा देश कोणता?

Maharashtra Live News Update : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT